लग्नाच्या आधी का लावली जाते हळद? नवरदेव नवरीवर काय होतो याचा परिणाम
असे मानले जाते की लग्नापूर्वी हळद लावल्याने जोडप्याला सुखी जीवनाचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच हळदीमध्ये त्वचा सुधारण्याचे आणि चमकदार बनवण्याचे गुणधर्म देखील आहेत.
मुंबई, भारतात लग्नसमारंभ म्हणजे एकप्रकारचा मोठा सोहळाच असतो. कारण भारतीय संस्कृतीत लग्नाच्या प्रथा हा हजारो वर्षांपासून यशस्वीपणे पाळल्या जात आहेत. त्यात लग्नात घातल्या जाणाऱ्या कपड्यांपासून तर दागिन्यांपर्यंत, अशा अनेक गोष्टी या खबरदारीनं पाळल्या जातात. परंतु तुम्ही विचार केलाय का लग्नात नवरा आणि नवरीला हळद (Haldi in Marrage) किंवा मेहेंदी का लावली जाते?, त्याबद्दल जाणून घेऊयात. भारतीय परंपरेत हळद अतिशय शुभ मानली जाते,ज्यामध्ये हळदीचा लेप वधू-वरांना लावला जाते. हळदीमध्ये तेल आणि पाणी मिसळून ही पेस्ट तयार केली जाते.
असे मानले जाते की लग्नापूर्वी हळद लावल्याने जोडप्याला सुखी जीवनाचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच हळदीमध्ये त्वचा सुधारण्याचे आणि चमकदार बनवण्याचे गुणधर्म देखील आहेत.
नवरा आणि नवरीला का लावतात हळद?
भारतात जवळपास सर्वच भागांमधील लग्नात नवरा आणि नवरीला हळद लावली जाते. महाराष्ट्रात तर हळद लावण्याचा स्पेशल प्रोग्राम असतो. यावेळी नवरा आणि नवरीच्या पूर्ण चेहऱ्यावर आणि हातापायांवर हळद लावली जाते. ही प्रथा मुलामुलींची सुंदरता वाढवण्यासाठी पाळली जाते, असं काही जाणकार सांगत असतात.
परंतु हळदीत असलेल्या औषधी गुणांमुळं त्याचा शरिराला फायदाच होत असतो. त्वचेवर लग्नावेळी हळद लावल्यानं त्यावरील बॅक्टिरीया संपण्यास मदत होते. त्याचबरोबर हळदी लावल्यानं त्वचा मॉस्चराइज होण्यासही मदत होते.
लग्नावेळी का लावतात मेहेंदी?
भारतातलं कोणतंही लग्न हे मेहेंदी लावल्याशिवाय होत नाही. कारण मेहेंदीविना नवरीचा श्रुंगार अपूर्ण मानला जातो. त्यामुळं भारतीय लग्नांत मेहेदीला अनन्यसाधारण महत्व आहे. याशिवाय मेहेंदीत एन्टीसेप्टिक तत्वही असतात, त्यामुळं नवरा व नवरीला तणाव आणि डोकेदुखीपासून बचाव करता येतो. याशिवाय त्यामुळं नखांचे आजारही कमी होऊन त्यांची सुंदरता वाढते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)