जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?
सनातन धर्माच्या इतिहासात जेव्हाही अधार्म, क्रुरता आणि निर्दयता वाढवणाऱ्यांनी जन्म घेतला आहे (Mahadeva Take Sarveshwar Avatara), त्यांचा विनाश निश्चित झाला आहे. विश्वाचे निर्माणकर्ता भगवान विष्णू अनेक युगात वेगवेगळ्या स्वरुपात आले आहेत आणि त्यांनी अधर्माचा नाश केला आहे.
मुंबई : सनातन धर्माच्या इतिहासात जेव्हाही अधर्म, क्रुरता आणि निर्दयता वाढवणाऱ्यांनी जन्म घेतला आहे (Mahadeva Take Sarveshwar Avatara), त्यांचा विनाश निश्चित झाला आहे. विश्वाचे निर्माणकर्ता भगवान विष्णू अनेक युगात वेगवेगळ्या स्वरुपात आले आहेत आणि त्यांनी अधर्माचा नाश केला आहे. द्वापर युगात भगवान कृष्णाने कंस वधापासून ते महाभारतपर्यंत, त्रेतायुगात भगवान रामाने रावणाची हत्या केली होती आणि सत्ययुगात भगवान नरसिंह यांनी हिरण्यकश्यपूची हत्या केली होती. याशिवाय भगवान विष्णूने बरेच अवतार घेतले आणि पापींचा नाश केला (Why Mahadeva Take Sarveshwar Avatara To Calm Down Lord Narsimha).
आजच्या कथेमध्ये आपण हिरण्यकश्यपूचा नाश करणार्या भगवान नरसिंहाचे काय झाले याबद्दल जाणून घेऊ? हिरण्यकश्यपूच्या वधानंतर ते ब्रम्हांडात भटकत राहिले की अदृश्य झाले? की त्यांचा वध झाला?
नरसिंह अवताराचे काय झाले?
सत्ययुगात हिरण्यकशिपू एक अत्यंत निर्दयी असूर होता. तो असुरांचा राजा होता. त्याने ब्रह्माजींची कठोर तपश्चर्या करुन एक वरदान प्राप्त केले की मनुष्य किंवा प्राणी त्याला मारु शकत नाही, तो दिवसा किंवा रात्री मारला जाऊ शकत नाही, तो घरात किंवा बाहेर, शस्त्रास्त्रांनी किंवा अस्त्रांनी मारलं जाऊ शकत नाही. असे वरदान मिळाल्याने त्याला हा अहंकार झाला की तो जगातील सर्वात शक्तिशाली आहे आणि कोणीही त्याला मारु शकत नाही.
अशाप्रकारे, तो स्वत:ला देव मानू लागला आणि त्याची इच्छा होती की लोकांनी त्याची उपासना करावी विष्णूची नव्हे. पण, त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. प्रल्हादाच्या क्रूर आणि गर्विष्ठ वडिलांनी त्याला जिवे मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला. मग शेवटी हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिकाला जिला अग्नीने न जळण्याचा वरदान होता तिला प्रल्हादला घेऊन आगीवर बसण्यास सांगितले. परंतु भगवान विष्णूने आपल्या भक्त प्रल्हादचे रक्षण केले आणि त्यांचे प्राण वाचवले आणि होलिका होलिकाच्या अग्नीच्या होरपळली.
यानंतर, जेव्हा हिरण्यकशिपूने स्वत: प्रल्हादावर अत्याचार करण्यास सुरवात केली तेव्हा नरसिंहाच्या रुपात भगवान विष्णूने एका खांबातून प्रकट होऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. अशाप्रकारे, ब्रम्हाजींनी दिलेलं वरदानदेखील कायम राहिलं आणि अनीति आणि पापांचा नाश देवाने केला.
पण, या भीषण वृत्तानंतर नरसिंह भगवानाचा राग शांत झाला नाही. त्यांच्या रागामुळे संपूर्ण विश्व घाबरले. ही परिस्थिती पाहून सर्व देवता महादेवांकडे गेले आणि त्यांनी भगवान नरसिंहांचा राग शांत करावा अशी प्रार्थना केली. मग शिवाने प्रथम वीरभद्रला नरसिंह शांत करण्यासाठी पाठवले पण वीरभद्रदेखील त्यांचा राग शांत करु शकले नाही, शेवटी महादेवाने सर्वेश्वराचा अवतार घेतला.
शिवच्या या स्वरुपाला शरभ अवतार असेही म्हणतात, ज्यात माणूस, पक्षी आणि सिंह यांचा समावेश होता. सर्वेश्वराच्या अवतारात महादेवाने भगवान नरसिंहाचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर सलग अठरा दिवस सर्वेश्वर भगवान आणि नरसिंह भगवान यांचे युद्ध चालू होते. या युद्धाचा शेवट नव्हता.
जेव्हा नरसिंहांच्या क्रोधाचा काळ कमी होऊ लागला, तेव्हा त्याला वाटले की शिवने आपला राग शांत करण्यासाठीच हे स्वरुप घेतलं आहे. मग नरसिंह भगवान शांत झाले आणि श्री हरिविष्णूमध्ये विलीन झाले.
काही पौराणिक कथांनुसार, शिवच्या शरभ अवताराचे रुप फारच भयंकर होते. त्यांच्यासमोर नरसिंह स्वरुपाची शक्ती संपली आणि भगवान नरसिंहाने आत्मसमर्पण केले आणि शांत केले आणि भगवान विष्णूमध्ये विलीन झाले.
अशाप्रकारे भगवान नरसिंहचा राग शांत झाला आणि शिवच्या शरभ अवतारातून भगवान नरसिंहच्या क्रोधापासून सर्व सृष्टी वाचली.
Kedarnath Temple | पांडवांनी केदारनाथ मंदिर का बनवलं? जाणून घ्या पांडव आणि महादेवाची ही पौराणिक कथाhttps://t.co/ZguCa4ZmIJ#KedarnathTemple
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 23, 2021
Why Mahadeva Take Sarveshwar Avatara To Calm Down Lord Narsimha
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :