शनिवारी आणि गुरूवारी का कापू नये नखं? जाणून घ्या कारण
केस कापण्याचा शुभ दिवस रविवार, बुधवार व शुक्रवार आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी कधीही केस कापू नये. यामुळे बरेचसे नुकसान होऊ शकते.
मुंबई : आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखे कापू नयेत (Nail Cutting Rules) असे तुम्ही घरातल्या मोठ्या लोकांकडून ऐकले असेल. या दिवशी दाढी आणि केस कापण्यास देखील मनाई केली जाते. तुमच्या कधी लक्षात आले असेल की, न्हाव्याचे दुकान शनिवारी बंद असते, मंगळवार आणि गुरुवारी त्याचे ग्राहकही कमी येतात. असे का घडते? या मागचे कारण म्हणजे हे दिवस ग्रहांशी संबंधित आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखे कापल्याने ग्रह दोष निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात नखे कापण्यास मनाई आहे.
मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखे कापू नये यासाठी धार्मिक कारणे
1. मंगळवार मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मंगळाचा संबंध रक्ताशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंगळवारी नखे कापल्याने रक्ताशी संबंधित विकार होऊ शकतात. या दिवशी नखे, केस आणि दाढी कापल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित दोष निर्माण होऊ शकतात.
2. गुरुवार देव गुरु बृहस्पतिशी संबंधित आहे. बृहस्पति हा बुद्धिमत्ता, ज्ञान, शिक्षण आणि शुभ कार्याचा कारक मानला जातो. गुरुवारी नखे, केस आणि दाढी कापल्याने व्यक्तीला या भागात नुकसान सहन करावे लागू शकते किंवा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे या दिवशी नखे, केस आणि दाढी टाळली जाते. गुरुवार हा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी केस कापल्याने लक्ष्मी माता रुष्ट होते. तसेच मानसन्मानाचीही हानी होते. पोटाचे आजार जडण्याची संभाव्यता असते. या दिवशी ग्रहणाकडून येणारी किरणे शरीरावर प्रतिकुल प्रभाव पाडत असते. यामुळे गुरुवारी देखील कधीही नखे कापू नये.
वैज्ञानिक कारण
वैज्ञानिक कारणाबद्दल सांगायचे झाल्यास मंगळवार, शनिवार आणि गुरुवारी विश्वातून येणाऱ्या अनेक प्रकारच्या ऊर्जेचा मानवी शरीराच्या संवेदनशील भागांवर विशेष प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात नखे कापू नयेत असा सल्ला दिला जातो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)