Lord Shree Ganesha | भगवान गणेशाला तुळस अर्पण का केली जात नाही? जाणून घ्या ही पौराणिक कथा

बुधवारचा दिवस हा गणेशाला (Lord Shree Ganesha) समर्पित असतो. मान्यता आहे की, या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हिंदु धर्मात प्रथम गणपतीची उपासना केली जाते.

Lord Shree Ganesha | भगवान गणेशाला तुळस अर्पण का केली जात नाही? जाणून घ्या ही पौराणिक कथा
ganesh
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 12:21 PM

मुंबई : बुधवारचा दिवस हा गणेशाला (Lord Shree Ganesha Puja) समर्पित असतो. मान्यता आहे की, या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हिंदु धर्मात प्रथम गणपतीची उपासना केली जाते. कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. गणपती आपल्या भक्तांचे सर्व कष्ट दूर करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते (Why Offering Tulsi In Lord Shree Ganesha Puja Is Prohibited Know The Pouranik Katha).

परंतु तुम्हाला माहिती आहे की, गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करणे निषिद्ध मानले जाते. असे मानले जाते की गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केल्यामुळे देव क्रोधित होतात.

गणेश आणि तुळशीची पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, राजा धर्मात्मजची कन्या तुळशी ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेश जी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. पौराणिक कथेनुसार भगवान तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते. गळ्यात रत्नांची माळ होती. कमरेत रेशमचे पिताम्बर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते.

गणपतीचे ते सुंदर स्वरुप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला.

हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की, तुझे एक नाही दोन विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की, तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली.

यानंतर, गणेशजी म्हणाले, तू भगवान विष्णू आणि कृष्णाला प्रिय असल्यामुळे कलयुगात तुझी पूजा करणे मोक्षदायक ठरेल. परंतु तुला माझी पूजा करताना अर्पण करणे अशुभ मानले जाईल. तेव्हापासून श्रीगणेशाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले जाऊ लागले.

Why Offering Tulsi In Lord Shree Ganesha Puja Is Prohibited Know The Pouranik Katha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Akshaya Tritiya 2021 : अक्षय तृतीयेला ‘या’ शुभ गोष्टी खरेदी करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

Akshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही ही कामं करु नये, जाणून घ्या या दिवसाचं महत्व

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.