हवेच्या विरूध्द दिशेला का फडकतो जगन्नाथ मंदिरावरचा ध्वज, विज्ञानालाही देतेयं आव्हान

विरुद्ध दिशेला ध्वज फडकवण्याची आख्यायिका किंवा कारण हनुमानजीशी संबंधित आहे. हनुमानजी या भागाचे दहा दिशांनी रक्षण करतात. या स्थानाच्या प्रत्येक कणात हनुमानजी वास करतात अशी मान्यता आहे.

हवेच्या विरूध्द दिशेला का फडकतो जगन्नाथ मंदिरावरचा ध्वज, विज्ञानालाही देतेयं आव्हान
जग्गन्नाथ मंदिरImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 12:51 PM

मुंबई : श्री जगन्नाथ मंदिराच्या (Jagannath Temple) वर लावलेला लाल ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. असे का घडते, हे केवळ शास्त्रज्ञच सांगू शकतील, परंतु ही नक्कीच आश्चर्यकारक गोष्ट आहे. मंदिराच्या कळसावर बसवलेला ध्वज रोज संध्याकाळी चढवू्न बदलला जातो हे देखील एक आश्चर्य आहे. ध्वजही एवढा भव्य आहे की तो फडकवला की सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे आपोआप वळतात. ध्वजावर शिवाचा चंद्र बनवला आहे. या ध्वजाशी संबंधीत एक पौराणिक कथा आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.

अशी आहे पौराणिक कथा

विरुद्ध दिशेला ध्वज फडकवण्याची आख्यायिका किंवा कारण हनुमानजीशी संबंधित आहे. हनुमानजी या भागाचे दहा दिशांनी रक्षण करतात. या स्थानाच्या प्रत्येक कणात हनुमानजी वास करतात अशी मान्यता आहे. हनुमानजींनी येथे अनेक चमत्कार दाखवल्याचे पुराणात नमुद आहे. त्यापैकी एक म्हणजे समुद्राजवळ असलेल्या मंदिराच्या आत समुद्राचा आवाज थांबवणे. हा आवाज थांबवण्यासाठी ध्वजाची दिशाही बदलण्यात आली.

एकदा नारदजी भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी पोहोचले तेव्हा त्यांची भेट हनुमानजीशी झाली. हनुमानजी म्हणाले की यावेळी भगवान विश्रांती घेत आहेत, तुम्हाला थांबावे लागेल. नारदजी दाराबाहेर उभे राहून वाट पाहू लागले. काही वेळाने त्यांनी मंदिराच्या दरवाजातून आत डोकावले तेव्हा भगवान जगन्नाथ श्रीलक्ष्मीसोबत उदास बसले होते. त्यांनी परमेश्वराला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की समुद्राचा हा आवाज आपल्याला शांत झोपू देत नाही.

हे सुद्धा वाचा

नारदजी बाहेर गेले आणि त्यांनी हनुमानाला ही गोष्ट सांगितली. हनुमान क्रोधित झाले आणि समुद्राला म्हणाले की तू  तुझा आवाज बंद कर कारण  तुझ्या आवाजामुळे देवाला झोप लागत नाही. हे ऐकून समुद्रदेव प्रकट झाले आणि म्हणाले की हे महावीर हनुमान ! मी हा आवाज थांबवू शकत नाही. वाऱ्याचा वेग जिथवर जाईल तिथपर्यंत हा आवाज जाईल. यासाठी तुम्ही तुमचे वडील पवनदेव यांना विनंती करा.

तेव्हा हनुमानजींनी त्यांचे वडील पवनदेव यांना बोलावून मंदिराच्या दिशेने न वाहण्यास सांगितले. यावर पवनदेव म्हणाले की बेटा हे शक्य नाही पण मी तुला एक उपाय सांगतो की तुला मंदिराभोवती आवाजहीन वर्तुळ किंवा विवर्तन निर्माण करावे लागेल. हनुमानजींना समजले.

मग हनुमानजींनी आपल्या सामर्थ्याने स्वतःला दोन भागात विभागले आणि मग ते वाऱ्यापेक्षा वेगाने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालू लागले. त्यामुळे हवेचे असे चक्र निर्माण झाले की समुद्राचा आवाज मंदिराच्या आत न जाता मंदिराभोवती फिरत राहते आणि श्री जगन्नाथजी मंदिरात आरामात विश्रांती घेतात. हेच कारण आहे की मंदिराच्या कळसावरचा ध्वजही हवेच्या विरूध्द दिशेला फडकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.