स्मशानभूमीत महिलांना जाण्यासाठी का केली जाते मनाई? आश्चर्यकारक आहे कारण
कोणत्याही व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ पुरुषच स्मशानभूमीत जातात. महिलांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण त्यामागचे मुख्य कारण तुम्हाला माहीत आहे का?
मुंबई : हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक विधींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांचे पालन प्रत्येकजण करतात, परंतु त्यामागील कारण फार कमी लोकांना माहिती आहे. त्याच धर्मग्रंथात 16 संस्कारांबद्दल सांगितले आहे. यामध्ये अंतिम संस्कार म्हणजे अंत्य संस्काराबद्दलही (Hindu Ritual) माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ पुरुषच स्मशानभूमीत जातात. महिलांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण त्यामागचे मुख्य कारण तुम्हाला माहीत आहे का?
जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा अंत्ययात्रा काढली जाते, जी स्मशानभूमीत जाते. अंत्यसंस्कारात, एखाद्या व्यक्तीचे मृत शरीर पंचतत्वात विलीन होते. तुम्ही पाहिले असेलच की एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त पुरुष जातात, महिलांनी जाण्याची प्रथा नाही. यामागे अनेक कारणे सांगितली आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
स्त्रियांचे मन हळवे असते
स्त्रियांचे हृदय हळवे असते आणि स्मशानभूमीत त्यांच्या रडण्याचा आवाज मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती देत नाही, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. असे म्हणतात की, महिलांना रडताना पाहून मृत व्यक्तीचा आत्माही दुःख होते. याशीवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीचं शरीर जळतं तेव्हा त्याच्या हाडांमधून आवाज येतो. त्यामुळे महिला या आवाजांना घाबरतात. याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे.
महिलांचे मुडण करण्याची प्रथा नाही
पौराणिक मान्यतेनुसार कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे निधन झाले की घरातील सर्व पुरुषांचे मुंडण होते. पण महिला हे करत नाहीत. स्त्रियांचे मुंडण करणे शुभ नाही असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे महिलांचे मुंडन केले जात नाही किंवा स्मशानभूमीत जाणे शुभ मानले जाते.
दुष्ट आत्म्यांचा त्वरित प्रभाव पडतो
इतकंच नाही तर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यावर काही आत्म्यांना शांती मिळत नाही, अशीही एक मान्यता आहे. शांती न मिळाल्याने ते इकडे तिकडे भटकत राहतात. स्त्रिया हळव्या मनाच्या असतात च्याचा त्यांच्यावर प्रभाव होवू शकतो, त्यामुळे त्यांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)