तुमचं लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज? पाहा जन्म तारीख काय सांगते तुमची
ज्योतिष शास्त्रात जन्मतारीख आणि मूलांकांना विशेष महत्त्व असते. त्यावरून व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत अंदाज लावला जावू शकतो.
ज्योतिष शास्त्रात मूलांकाला विशेष महत्त्व आहे. तुमच्या मूलांकावरून तुमच्यासंदर्भात अनेक गोष्टी माहिती होतात. जसं तुमचा स्वाभाव, भविष्यात तुमच्यासोबत काय घटना घडू शकतात. तुमचं लग्न कसं होणार अरेंज की लव्ह मॅरेज अशा अनेक गोष्टींचा अंदाज हा तुमच्या मूलांकावरून लावला जाऊ शकतो.तुमचं लग्न होणार की नाही, लग्नामध्ये जर काही समस्या येत असतील तर त्या का येतात, त्यावर काय उपाय केल पाहिजे याची माहिती देखील तुम्हाला ज्योतिष शास्त्रातून मिळते.
ज्या व्यक्तींचा मूलांक 2 आहे म्हणजेच ज्यांचा जन्म हा 2, 11 आणि 29 तारखेला झाला आहे, त्या व्यक्तींचं लग्न हे लव्ह मॅरेज होण्याची शक्यता खूप अधिक असते. दोन मूलांक असलेले व्यक्ती हे प्रेमाच्या बाबतीत खूप नशिबवान असातत. ते आपल्या लाईफ पार्टनरची आयुष्यभर साथ देतात. ज्यांचा मूलांक दोन आहेत अशा व्यक्ती या अतिशय संवेदनशील आणि भावनिक असतात असं ज्योतिष शास्त्रात म्हटलं आहे.
मूलांक 2 प्रमाणेच ज्यांचा मूलांक हा 6 आहे म्हणजे ज्यांचा जन्म 6, 15 आणि 24 आहे या लोकांचं देखील लव्ह मॅरेज होतं. ज्यांचा मूलांक दोन आहे, असे लोक सर्वच बाबतीमध्ये लकी ठरतात.या लोकांना सर्व प्रकारची सुखं मिळतात. ज्यांचा मूलांक हा सहा आहे अशी लोक स्वभावाने खूप संवेदनशील आणि भावनाप्रधान असतात. जे आपल्या प्रियजनांवर जीवापाड प्रेम करतात. त्यांची काळजी घेतात. हे लोक दिसायला देखील आकर्षक आणि सुंदर असतात. या शिवाय हे लोक नेहमी कृतिशील असतात. ज्यांचा मूलांक सहा आहे असे लोक आपल्या स्वभावामुळे समोरच्या व्यक्तीचं मन सहज जिंकू शकतात. त्यामुळे यांच्या प्रेमविवाहाची शक्यता अधिक असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)