Feng Shui Tips: विंड चाइम अर्थात घंटा सुद्धा अनलकी ठरू शकतात; रोचक आणि आश्चर्यकारक माहिती जाणून घ्या

डेकोरेटिव्ह विंड चाइम्स घराची सजावट वाढवतात आणि नशीब चमकवतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.

Feng Shui Tips: विंड चाइम अर्थात घंटा सुद्धा अनलकी ठरू शकतात; रोचक आणि आश्चर्यकारक माहिती जाणून घ्या
डेकोरेटिव्ह विंड चाइम्स घराची सजावट वाढवतात आणि नशीब ही चमकवतात.
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 6:40 PM

Feng Shui Tips:तुम्हाला माहिती आहे हा गुडलक आणि पॉझिटिव्हीटी आणणारं विंड चाइम्स बॅड लकचं कारण देखील ठरू शकतं. भारतीय वास्तुशास्त्रा प्रमाणेच जपानी फेंगशुई नियम देखील अनेक उपय करून तुम्ही घरात सुख आणि शांतीचे वातावरण तयार करू शकता. फेंगशुई मध्ये काही अशा गोष्टी आहेत. ज्याने घरातील निगेटिव्हिटी सहज दूर होऊ शकते. इथे आम्ही तुमच्या सोबत विंज चाइम्सशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहेत. भारतात हीअनेक घराट विंड चाइम्स लावतात. (Wind Chime Tips) विंड चाइम्सच्या मधूर ध्वनिने मनला शांतता मिळते. घरात शांतता नांदते असं म्हणतात. पण, तुम्हाला माहिती आहे का. पॉझिटिव्हिटी देणारं विंड चाइम बॅड लकच कारणं ही बनू शकतं. त्यामागे असलेली कारणं जाणून घ्या.

बाजारा सहज मिळणारे विंड चाइम विकत घेताना किंवा घरात लावताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

विकत घेताना यागोष्टी लक्षात ठेवा

घरातील वास्तूदोष कुठे ही असू शकतो आणि विंड चाइम या दोष दूर करू शकतो. तर हे विकत घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही घरातील मुख्य द्वाराशी संबंधीत वास्तू दोष दूर करू इच्छिता तर तुम्ही चार दांड्या असलेलं. विंड चाइम विकत घ्या. त्याव्यतिरिक्त स्टडी रूमसाठी पाच दांड्या असलेलं तर, हॉल मध्ये सहा दांड्या असलेलं विंड चाइम लावा.

हे सुद्धा वाचा

विंड चाइम्सचे प्रकार

– ट्यूबलर चाइम हे नळ्या किंवा रॉड्ससारखे आकाराचे असतात आणि धातू आणि बांबूसह विविध प्रकारच्या सामग्रीमध्ये येतात. – बेल चाइम्स लहान किंवा मोठ्या घंटांनी बनवले जातात. – तुम्हाला हृदय, तारा, चंद्रकोर आणि त्रिकोण अशा विविध आकारांमध्ये विंड चाइम मिळू शकतात. – डेकोरेटिव्ह चाइम्समध्ये काच आणि सीशेल चाइम्सचा समावेश होतो आणि दोन्ही आनंदाने प्रकाश आणि आवाज प्रतिबिंबित करतात.

दिशा

विंड चाइम लावण्याआधी ते कोणत्या दिशेला लावले पाहिजे. हे ही माहिती करून गेणं गरजेचं आहे. फेंगशुई शास्त्रानुसार ते नेहमी पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावले पाहिजे. जर तुमच्याकडे लाकडी विंड चाइम असेल तर ते उत्तर पूर्व आणि दक्षिण दिशेला लटकवले पाहिजे. जर तुम्ही विंड चाइम लावण्याच्या दिशेवर लक्ष देत नसाल तर, त्याने घरात अशांतता कलह होतो आणि परिवारातील सदस्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो.

इथे लावू नका विंड चाइम

विंड चाइम घराची शोभा वाडवते म्हणून कुठे ही लावणं योग्य नाही. विंज चाइम किचन आणि देवघरात लावू नये. देवघर असलेल्या खोलीत विंड चाइम लावू नये. देवघर असलेल्या खोलीत देवी देवतांचा वास असतो आणि तुमची तिथे विंड चाइम लावण्याची चुक त्यांना नाराज करू शकते. विंड चाइम वाऱ्याचा प्रवाह ज्या दिशेने असेल अशा ठिकाणी लावणं कधी ही चांगलं. घराचे दार, तसंच खिडकी फेंगशुई विंड चाइम लटकविण्यासाठी सर्वात योग्य जागा आहे.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.