Zodiac Signs | ‘या’ तीन राशीच्या महिला नवरोबाला नाचवतात तालावर, तुमच्या बायकोची रास तर नाही?

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे स्वतःचे काही गुण आणि अवगुण असतात (Zodiac Signs). या आधारे ज्योतिषी त्या त्या राशीशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि येणाऱ्या काळाविषयी अंदाज लावतात.

Zodiac Signs | 'या' तीन राशीच्या महिला नवरोबाला नाचवतात तालावर, तुमच्या बायकोची रास तर नाही?
Zodiac-Signs
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 2:05 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे स्वतःचे काही गुण आणि अवगुण असतात (Zodiac Signs). या आधारे ज्योतिषी त्या त्या राशीशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि येणाऱ्या काळाविषयी अंदाज लावतात. काही राशींना अत्यंत डॉमिनेटिंग मानलं जातं, ज्यांना नेहमी त्यांच्यानुसार सर्व काही करवून असते (Women Of These Three Zodiac Signs Dominates Their Husband).

ज्या स्त्रिया या राशींशी संबंधित असतात, त्या त्यांच्या डॉमिनेटिंग स्वभावामुळे नेहमीच आपल्या पतीवर वर्चस्व गाजवतात आणि नवरोबाला तालावर नाचवतात. जाणून घेऊया या राशींसंबंधी –

मेष राशी –

या राशीच्या स्त्रिया आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात आणि कुटुंबाचा नेहमी चांगला विचार करतात. त्या खूप धैर्यवान आणि निर्भीड असतात. परंतु त्यांचा स्वभाव खूप रागीट असतो आणि जेव्हा ते रागावतात तेव्हा ते कुणाचेही ऐकत नाही. ती तिच्या पतीकडून हव्या त्या गोष्टी करवून घेते. जरी त्यांचा राग तीव्र असतो, तरी काही काळानंतर ते स्वतःहून शांत होतात. त्यानंतर, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव देखील होते.

कर्क राशी –

या राशीच्या स्त्रिया मनापासून खूप चांगल्या असतात आणि भावूक असतात. त्या त्यांचे नाते अतिशय प्रामाणिकपणे निभावते. त्या आपल्या कुटुंबाला खूप चांगल्याने सांभाळतात. परंतु त्यांना स्वतंत्रपणे काम करायला आवडते. त्या इतरांच्या म्हणण्यानुसार काहीही करत नाहीत. त्या स्वत:च्या अटींनुसार जगतात आणि पतीचं काहीही त्यांच्यापुढे चालत नाही. पण, त्या त्यांच्या पतीसाठी अतिशय भाग्यवान सिद्ध होतात.

सिंह राशी –

सिंह राशीच्या स्त्रिया मोठ्या मनाच्या असतात आणि सर्वांचा विचार करतात. परंतु त्यांचा राग तितकाच तीव्र असतो. जेव्हा तिला राग येतो तेव्हा त्या त्यांचा विवेक गमावून बसतात. त्यांना शांत करणे कुणालाही जमत नाही. अशा परिस्थितीत, त्यांचा जोडीदार त्यांच्यासमोर काहीही बोलण्यापूर्वी बऱ्याचवेळा विचार करतात आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.

Women Of These Three Zodiac Signs Dominates Their Husband

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | भावनांवर उत्तम नियंत्रण, या पाच राशींच्या व्यक्तींचा EQ असतो लय भारी

Zodiac Signs | ‘या’ तीन राशीचे लोक मुख्यत: सरकारी नोकरीत उच्च पद भूषवतात, तुमची राशी तर नाही यात?

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.