पूजा करताना तुम्हालाही वारंवार जांभई येते, आळस येतो? जाणून घ्या त्यातून काय संकेत मिळतो
आपल्यापैकी अनेकजण दररोज सकाळी देवपूजा करतात. काही लोक तर सायंकाळच्यावेळी देखील देवाची प्रार्थना करतात. मात्र तुम्ही कधी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे का? की जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता किंवा देवाची प्रार्थना करत असता तेव्हा तुम्हाला अचानक जांभई येते.

आपल्यापैकी अनेकजण दररोज सकाळी देवपूजा करतात. काही लोक तर सायंकाळच्यावेळी देखील देवाची प्रार्थना करतात. मात्र तुम्ही कधी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे का? की जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता किंवा देवाची प्रार्थना करत असता तेव्हा तुम्हाला अचानक जांभई येते, काही काहीवेळेस तर एकदा दोनदा नाही तर अनेकदा जांभई येते. यामुळे होतं काय तर तुमचं देवपूजेमध्ये, प्रार्थनेमध्ये लक्ष लागत नाही. मात्र ही काही सामान्य गोष्ट नाहीये, यामधून केवळ तुम्हाला झोप आली आहे किंवा तुम्ही थकले आहात, एवढाच संकेत मिळत नाही तर देवपूजेच्या वेळी वारंवार जांभई येणं ही घटना तुमच्या शरीराची आणि मनाची स्थिती दर्शवते, असा दावा ज्योतिष शास्त्रामध्ये करण्यात आला आहे.
पूजा करताना जांभई का येते?
पूजा करत असताना जर तुम्हाला वारंवार जांभई येत असेल तर याचा अर्थ असा होती की, तुमचं मन पूजेमध्ये लागत नाहीये. तुम्ही देवाची पूजा किंवा प्रार्थना करत असता मात्र तुमच्या मानामध्ये वेगळेच कोणते तरी विचार सुरू असतात, तुमचं लक्ष विचलीत झाल्यामुळे तुमचा मेंदू देखील थकतो. मनात विचारांची गर्दी होते त्यामुळे तुम्हाला जांभई येते.
काही लोकांना तर पूजा करताना झोप सुद्धा येते. याचा एक कारण हे देखील असू शकतं की तुम्ही थकलेले आहात.दिवसभर आपण काम केलेलं असतं, त्यानंतर सायंकाळच्या वेळी अनेकजण देवाची प्रार्थना करतात. दिवसभराच्या थकव्यामुळे अनेकांचं लक्ष पूजा, प्रार्थनेमध्ये लागत नाही, त्यामुळे त्यांना जांभई येते, तुमच्या शरीराला तेव्हा आरामाची गरज असते. मात्र जर या घटना तुमच्यासोबत वारंवार घडत असतील तर तुमचं मन पूजा करताना तुम्ही शांत ठेवू शकत नाहीत, याचे ते संकेत असतात.
ज्योतिषशास्त्र असं सांगतं की तुमच्या मनात विचांरांचं चक्र सतत सुरू असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला स्थिर ठेवू शकत नाहीत. तुम्ही जेव्हा पूजा किंवा प्रार्थना करत असतात तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि भावना एका विशिष्ट दिशेनं प्रवाहीत होत असते, मात्र डोक्यात जर दुसरेच विचार सुरू असतील तर तु्म्ही त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाहीत, असं अध्यात्म सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)