Yogini Ekadashi 2023 : आज योगिनी एकादशी, कुबेराच्या शापातून मुक्त होण्यासाठी माळ्याने केले होते हे व्रत

प्राचीन काळी अल्कापुरी नगरीत कुबेर राजाच्या ठिकाणी हेम नावाचा माळी राहत होता. भगवान शंकराच्या पूजेसाठी मानसरोवरातून रोज फुले आणणे हे त्यांचे काम होते. एके दिवशी त्याला फुले आणायला उशीर झाला कारण त्याला त्याच्या बायकोसोबत एकांतात वेळ घालवायचा होता

Yogini Ekadashi 2023 : आज योगिनी एकादशी, कुबेराच्या शापातून मुक्त होण्यासाठी माळ्याने केले होते हे व्रत
भगवान विष्णूImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 10:28 AM

मुंबई : हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व सांगितले आहे. एकादशी (Yogini Ekadashi 2023) महिन्यातून दोनदा येते – पहिली कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हणतात. एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि अनेक प्रकारची पापे नष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे. यावेळी योगिनी एकादशीचे व्रत 14 जून म्हणजेच आज पाळली जात आहे. या दिवशी भगवान विष्णूंचे ध्यान, भजन आणि कीर्तन केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. योगिनी एकादशीच्या दिवशी व्रत आणि साधना केल्याने अडचणी दूर होतात.

योगिनी एकादशी शुभ मुहूर्त

योगिनी एकादशीचे व्रत बुधवार, 14 जून रोजी म्हणजेच आज आहे. एकादशी तिथी आज सकाळी  8.48 वाजता सुरू झाली आहे 15 तारखेला सकाळी 8.31 मिनीटांपर्यंत असेल.

योगिनी एकादशी पूजन पद्धत

योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. देवाला फळे आणि फुले अर्पण करा आणि खऱ्या भक्तीने त्याची आरती करा. भगवान विष्णूच्या कृपेने जिथे सकारात्मक उर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करेल. आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने संपत्तीचा साठा भरून निघेल. आर्थिक आघाडीवर समृद्धी वाढेल.

हे सुद्धा वाचा

योगिनी एकादशी व्रताचे नियम

योगिनी एकादशीला स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. श्रीहरीला पिवळी फुले, पंचामृत आणि तुळशीची डहाळ अर्पण करा. श्री हरी आणि माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा. पाणी, धान्य, कपडे, बूट आणि छत्री एखाद्या गरीबाला दान करा. या दिवशी फक्त पाणी आणि फळे घेऊन उपवास ठेवा. पूजा सकाळी आणि संध्याकाळी दोनदा केली जाते.

मानसिक समस्यांवर करा हे उपाय

योगिनी एकादशीचे व्रत ठेवावे. दिवस आणि रात्री फक्त पाण्याचा आहार घ्या. शक्य तितकी भगवान शिवाची पूजा करा. कमी बोला आणि रागावू नका.

नोकरीतील समस्या दूर करण्यासाठी

या दिवशी लाल रंगाचे आसन घ्या, त्याच्या चार कोपऱ्यांजवळ एकमुखी दिवा लावा. आसनावर बसून संकटमोचन हनुमानाष्टक पठण करा. हनुमानजींना नोकरीतील समस्या दूर व्हावी म्हणून प्रार्थना करा.

योगिनी एकादशी व्रताची कथा

प्राचीन काळी अल्कापुरी नगरीत कुबेर राजाच्या ठिकाणी हेम नावाचा माळी राहत होता. भगवान शंकराच्या पूजेसाठी मानसरोवरातून रोज फुले आणणे हे त्यांचे काम होते. एके दिवशी त्याला फुले आणायला उशीर झाला कारण त्याला त्याच्या बायकोसोबत एकांतात वेळ घालवायचा होता. तो उशिरा दरबारात पोहोचला. त्यामुळे संतप्त झालेल्या कुबेरांनी त्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला. शापाच्या प्रभावामुळे हेम माळी इकडे तिकडे भटकत एके दिवशी मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचले. आपल्या योगसामर्थ्याने ऋषींनी त्याच्या दुःखाचे कारण शोधून काढले. त्यानंतर योगिनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. उपवासाच्या प्रभावामुळे हेमालीचा कुष्ठरोग संपून त्याला मोक्ष प्राप्त झाला.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.