आपलं स्वागत… प्रणिती शिंदेंचं भाजप लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंना पत्र
बाहेरचा असो की इथला...सोलापुरात सर्वांना मत मांडण्याची मुभा आहे. पुढील ४० दिवस लोकशाहीचा आदर करत एकमेकांविरूद्ध उभे राहू, असे देखील प्रणिती शिदे यांनी पत्राद्वारे राम सातपुते यांना सांगितले आहे. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते....
प्रणिती शिंदे यांनी भाजप लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना पत्र लिहिले आहे. आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. बाहेरचा असो की इथला…सोलापुरात सर्वांना मत मांडण्याची मुभा आहे. पुढील ४० दिवस लोकशाहीचा आदर करत एकमेकांविरूद्ध उभे राहू, असे देखील प्रणिती शिदे यांनी पत्राद्वारे राम सातपुते यांना सांगितले आहे. ‘मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते. या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली त्याबद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, सामस्या आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवादाला सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरूद्ध उभे राहू, समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो. यावर आपण लढाई लढू अशी मी आशा करते’, असे पत्राद्वारे म्हटले आहे.