भारत-पाकिस्तान सामन्यात वापरलेल्या चेंडूची विक्री, किंमत तब्बल…
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना प्रत्येक भारतीयांसाठी खास असतो. या सामन्यासाठी प्रत्येकजण वेळात वेळ काढून हा सामना पाहण्यासाठी उत्साहीत असतो.
मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना प्रत्येक भारतीयांसाठी खास असतो. या सामन्यासाठी प्रत्येकजण वेळात वेळ काढून हा सामना पाहण्यासाठी उत्साहीत असतो. याशिवाय या सामन्यातील प्रत्येक गोष्ट ही क्रिकेट चाहत्यासाठी महत्त्वाची असते. नुकतेच या सामन्यात वापरण्यात आलेला चेंडू विकण्यात आला. हा चेंडू तब्बल 1.5 लाख रुपयांना विकण्यात आला आहे. हे एकून तुम्हालाही धक्का बसला ना, हो पण हे खरं आहे.
विश्वचषक सामन्यात मागे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात वापरण्याता आलेला चेंडू 1.5 लाख रुपयांना विकला आहे. या रोमांचक सामन्याची आठवण राहावी म्हणून हा चेंडू एका व्यक्तीने विकत घेतला आहे.
या विश्वकपमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजय मिळवला होता. भारताने 89 धावांनी पाकिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात वापरण्यात आलेला चेंडू 1.5 लाख रुपयांना विकला गेला आहे. एका क्रिकेट चाहत्याने हा चेंडू विकत घेतला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात वापरण्यात आलेला टॉसही विकत घेण्यात आला आहे.
हा चेंडू ऑफशिलमेमोराबिला डॉट कॉमवर विक्रीसाठी होता. या वेबसाईटवरुन हा चेंडू 2150 डॉलर भारतीय रुपयात 1.5 लाख रुपयाला विकला गेला. तसेच टॉसची किंमत 1450 डॉलर (एक लाख), तसेच सामन्यातील स्कोअरशीट 1100 डॉलर (77 हजार रुपये) मध्ये विकण्यात आला. एक आठवण म्हणून क्रिकेट चाहत्यांनी या वस्तू मोठी रक्कम देऊन खरेदी केल्या.
ऑफिशलमेमोराबिला डॉट कॉमवरुन खरेदी करायची असल्यास तुम्हाला वेबसाईटवर जाऊन लॉग ईन करावे लागेल. यानंतर तुम्हाला एखादी वस्तू आवडल्यास त्याचे पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा पत्ता मेमोराबिलाच्या डिलीव्हरीसाठी द्यावा लागेल.