2021 IPL Players Auction : लिलावापूर्वी कोणत्या संघात कोणते खेळाडू? जाणून घ्या एका क्लिकवर

2021 IPL Players Auction लिलावापूर्वी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सध्या कोणत्या संघाकडे किती आणि कोणते खेळाडू आहेत? तसेच कोणता संघी किती नवे खेळाडू त्यांच्या ताफ्यात सामावून घेऊ शकतो?

2021 IPL Players Auction : लिलावापूर्वी कोणत्या संघात कोणते खेळाडू? जाणून घ्या एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 12:33 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या (IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठ संघांकडून त्यांच्याकडील खेळाडू आणि संघातून मुक्त करणाऱ्या खेळाडूंची यादी गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आली होती. तसेच काही संघांनी लिलावापूर्वीच (IPL 2021 Auction) खेळाडूंची अदलाबदली केली आहे. दरम्यान IPL 14 साठी आज खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेत एकूण 292 खेळाडू उतरणार असून ही प्रक्रिया चेन्नईमध्ये पार पडणार आहे. त्यासोबतच देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका करणाऱ्या अनेक खेळाडूंवर फ्रँचायजींकडून मोठी बोली लावली जाणार आहे. दरम्यान, लिलावापूर्वी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सध्या कोणत्या संघाकडे किती आणि कोणते खेळाडू आहेत? तसेच कोणता संघी किती नवे खेळाडू त्यांच्या ताफ्यात सामावून घेऊ शकतात? (IPL Auction 2021, All Teams and players list)

कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत?

Chennai Super Kings

महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, इम्रान ताहीर, अंबाती रायुडू, एन जगदीसन, ऋतुराज गायकवाड, के आसीफ, रवींद्र जाडेजा, जोश हेझलवूड, कर्ण शर्मा, दीपक चाहर, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगिडी, सॅम कुरन, रविश्रीनिवासन साई किशोर, रॉबिन उथप्पा

Delhi Capitals

शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, अवेश खान, कगिसो रबाडा, नॉर्टजे, मॉर्कस स्टॉयनिस, शिमरन हेटमायर

Mumbai Indians

रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, क्विंटन डीकॉक, अनमोलप्रित सिंह, आदित्य तरे, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, मोहसीन खान, राहुल चाहर, अनुकूल रॉय

Rajsthan Royals

रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, जयदेव उनाडकट, अँड्र्यू टाय, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे, अनुज रावत, यशस्वी जयस्वाल

Kolkata Knight Riders

इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितीश राणा, शुभमन गिल, रिंकू सिंग, राहुल त्रिपाठी, सुनिल नारीन, आंद्रे रसेल, पॅट कमिंस, वरुण चक्रवर्ती, लोकी फर्ग्युसन, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, परशिद कृष्णा, हॅरी गुर्नी, संदीप वॉरियर

Kings XI Punjab

केएल राहुल, मनदीप सिंह, निकोलस पूरन, ख्रिस गेल, प्रभसिमरन सिंह, मयंक अग्रवाल, सरफराज खान, हरप्रीत बराड, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई, इशान पोरेल, मुरुगन अश्विन, दर्शन नालकंडे

Sunrisers Hyderabad

डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, केन विलियम्सन, जॉनी बेयरस्टो, रिद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, प्रियम गर्ग, विराट सिंह, रशिद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, मिशेल मार्श, जेसन होल्डर, अब्दुल समद, टी. नटराजन, खलील अहमद, संदीप शर्मा, तुलसी थंपी, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार

Royal Challengers Bangalore

विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदिप सैनी, अ‌ॅडम झँपा, शहबाज अहमद, जोश फिलिपे, केन रिचर्डसन, पवन देशपांडे

कोणता संघ किती खेळाडू घेऊ शकणार?

फेब्रवारी महिन्यात होणाऱ्या लिलावलात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) हा संघ 13 खेळाडूंना खरेदी करु शकेल. तर सनरायझर्स हैदराबाद या संघाला फक्त तीन खेळाडूंना खरेदी करता येईल. किंग्स ईलेव्हन पंजाब (KXIP) या टीमकडे सर्वाधिक 53 कोटी 10 लाख रुपयांची राशी असून ते मोठ्या ताकदीने लिलाव प्रक्रियात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर हैदराबाद संघाकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी 10 कोटी 75 लाख रुपयांचे भांडवल असेल. चेन्नई सुपर किंग्स (CSK) जवळ एकूण 22 कोटी 70 लाख रुपये असून चेन्नई संघाला एकूण 7 खेळाडू खरेदी करता येतील. चेन्नई सुपर किंग्स या संघाने या वर्षी हरभजन सिंग आणि केदार जाधव या खेळाडूंना आपल्या संघातून वगळले आहे.

लिलावात किती खेळाडू सहभागी होतील?

यावेळी आयपीएल 2021 लिलावात एकूण 292 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये 144 भारतीय, 122 परदेशी आणि 3 असोशिएट संघाचे खेळाडू आहेत. या मिनी ऑक्शनमध्ये एकूण 292 पैकी 62 खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. या 62 खेळाडूंवर 8 संघांची नजर असणार आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या लिलावासाठी एकूण 1 हजार 97 खेळाडूंनी नोंदणी केली होती. यापैकी एकूण 292 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते आणि यादी 8 सर्व फ्रँचायझींना पाठविण्यात आली.

सर्वाधिक रक्कम कोणाकडे?

या लिलावासाठी सर्वाधिक रक्कम ही पंजाबकडे आहे. पंजाबकडे 53 कोटी 20 लाख इतकी रक्कम आहे. तर कोलकाताकडे सर्वात कमी म्हणजेच 10 कोटी 75 लाख इतकी राशी आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलनुसार प्रत्येक फ्रँचायजीला किमान 75 टक्के रक्कम ही खर्च करणं बंधनकारक असणार आहे. असं न केल्यास संबंधित फ्रँचायजीकडील उर्वरित रक्कम ही जप्त केली जाईल.

  • पंजाबकडे लिलावासाठी उपलब्ध रक्कम-53 कोटी 20 लाख
  • बंगळुरुकडे असलेली रक्कम 35 कोटी 90 लाख
  • राजस्थानकडील रक्कम- 34 कोटी 85 लाख
  • चेन्नईकडे असलेली एकूण रक्कम – 22 कोटी 90 लाख
  • गतविजेत्या मुंबईकडे लिलावासाठी उपलब्ध रक्कम राशी – 15 कोटी 35 लाख
  • उपविजेतेपद मिळवलेल्या दिल्लीकडे असलेली रक्कम – 12 कोटी 90 लाख
  • हैदराबादकडे लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम-10 कोटी 75 लाख
  • कोलकाताकडे लिलावासाठी उपलब्ध रक्कम- 10 कोटी 75 लाख

संबंधित बातम्या

IPL 2021 Auction Rules | आयपीएलच्या मिनी ऑक्शनदरम्यान सर्व फ्रँचायजींसाठी महत्वाचे 6 नियम

IPL 2021 Auction | लिलावाच्या आधी धोनीच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का, चेन्नईची 12 वर्षांपासूनची पंरपरा खंडीत

IPL 2021 Auction आधी किंग्ज इलेव्हन पंजाबने नाव बदललं, आता नशीब बदलणार का?

(IPL Auction 2021, All Teams and players list)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.