IndvsAus Live: कमिन्सने आजचा पराभव उद्यापर्यंत टाळला
मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीत पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाचा आजचा पराभव टाळला. कारण ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज तंबूत परतले असताना, पॅट कमिन्सने एकट्याने तळ ठोकून 103 चेंडूत नाबाद 61 धावा ठोकल्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना आज ऑस्ट्रेलियाचं शेपूट गुंडाळता न आल्याने, आजचा विजय उद्यावर पोहोचला आहे. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 8 बाद 258 अशी मजल मारली […]
मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीत पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाचा आजचा पराभव टाळला. कारण ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज तंबूत परतले असताना, पॅट कमिन्सने एकट्याने तळ ठोकून 103 चेंडूत नाबाद 61 धावा ठोकल्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना आज ऑस्ट्रेलियाचं शेपूट गुंडाळता न आल्याने, आजचा विजय उद्यावर पोहोचला आहे. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 8 बाद 258 अशी मजल मारली आहे. कमिन्स 61 तर नॅथन लायन 6 धावांवर खेळत आहे. भारताला विजयासाठी केवळ दोन विकेट्सची गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 141 धावांची गरज आहे.
आजचा दिवस खऱ्या अर्थाने पॅट कमिन्सने गाजवला. कमिन्सने आधी गोलंदाजीत करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी करत, 27 धावात 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीत त्याने एकट्याने 103 चेंडू अर्थात 17 षटकं खेळून काढली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजावं लागलं. कमिन्सला नॅथन लायनने 38 चेंडूत 6 धावा करुन चांगली साथ दिली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 42 धावांची भागिदारी केली.
त्याआधी शॉन मार्श आणि टीम हेडने सावध खेळी करत धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉन मार्शला बुमराहने 44 धावांवर आणि हेडला इशांतने 34 धावांवर माघारी धाडत मोठा अडथळा दूर केलं. सलामीवीर हॅरिस 13, फिंच 3 आणि उस्मान ख्वाजा 33 धावा करुन बाद झाला. तर मिचेल मार्श आणि कर्णधार टीम पेनचा काटा जाडेजाने काढला. मार्शने 10 तर पेनने 26 धावा केल्या. यानंतर मोहम्मद शमीने स्टार्कला 18 धावांवर बाद करुन आठवा धक्का दिला. त्यामुळे भारत आजच हा सामना खिशात टाकेल अशी अपेक्षा होती. मात्र कमिन्सने आधी गोलंदाजीत त्यानंतर फलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आजचा पराभव टळला.
Stumps on Day 4 of the 3rd Test.
Australia 258/8, #TeamIndia 2 wickets away from victory #ASUvIND pic.twitter.com/if6aBFoIT0
— BCCI (@BCCI) December 29, 2018
दरम्यान या कसोटीत भारताने आज 5 बाद 54 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. सलामीवीर मयांक अग्रवालने कालच्या 28 धावांमध्ये आणखी 14 धावांची भर घालून तो 42 धावा करुन माघारी परतला. मात्र ऋषभ पंतने एक बाजू लावून धरली. मयांक बाद झाल्यावर पंतच्या साथीला रवींद्र जाडेजा आला, मात्र तो ही 7 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंतला 33 धावांवर पॅट कमिन्सने बाद केलं. पंत बाद झाल्यानंतर विराट कोहलीने भारताचा दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित केला.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. त्याआधी भारताच्या बुमरानेही धारदार गोलंदाजी करत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताला 292 धावांची आघाडी मिळाली होती. त्यात दुसऱ्या डावातील 106 धावा मिळवल्याने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचं लक्ष्य आहे.
संबंधित बातम्या
दिवसभरात 15 विकेटस्, मेलबर्न कसोटी रंगतदार स्थितीत