Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | 24 डावात 7 अर्धशतकं, 839 धावा, मात्र शतकी खेळी करण्यास विराट कोहली अपयशी

विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 89 धावांची खेळी केली.

India vs Australia 2020 | 24 डावात 7 अर्धशतकं, 839 धावा, मात्र शतकी खेळी करण्यास विराट कोहली अपयशी
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 11:29 AM

सिडनी : ऑस्ट्रेलियाने ( team Australia) टीम इंडियावर (Team India) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या दुसऱ्या सामन्यात 89 धावांची झुंजार खेळी केली. मात्र विराट टीम इंडियाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. विराटच्या झुंजार खेळीनंतरही त्याच्या नावे काही नकोसे विक्रम झाले आहेत. 7 half centuries 839 runs in 24 innings but Virat Kohli failed to score a century

विराटने गेल्या 24 डावांमध्ये 39.95 च्या सरासरीने 839 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 अर्धशतकं लगावली आहेत. चांगल्या सुरुवातीनंतरही विराटला या खेळींचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. म्हणजेच विराटला गेल्या 24 डावांमध्ये शतक लगावण्यास अपयशी ठरला आहे. विराट साधारणपणे प्रत्येक सातव्या सामन्यात शतक लगावतो.

विराटला मागील 4 मालिकांमध्ये एकही शतक लगावता आलं नाहीये. यामध्ये सुरु असलेली ऑस्ट्रेलियाविरोधातीस एकदिवसीय मालिका, न्यूझीलंड दौरा, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजचा भारत दौरा या मालिकांचा समावेश आहे. याआधी विराट सलग 3 मालिका तसेच स्पर्धांमध्ये शतक लगावण्यास अपयशी ठरला होता.

6 टी 20 सामन्यात अर्धशतक नाही

विराट या 2020 वर्षात एकूण 6 टी 20 सामने खेळला आहे. या 6 सामन्यात विराटला एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही. तसेच न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी सामन्यांमधील 4 डावात 38 धावाच करता आल्या आहेत.

विराट 12 वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. 27 फ्रेबुवारी 2011 ते 11 सप्टेंबर 2011 दरम्यान असाच प्रकार विराटसोबत घडला होता. तेव्हाही विराट 24 डावात शतक लगावण्यास अपयशी ठरला. विराटने 16 सप्टेंबर 2011 मध्ये इंग्लंडविरोधात शतकी खेळी करत ही मालिका खंडित केली.

मागील 2 मालिकांपासून सरासरी 30 पेक्षा कमी

विराटची सरासरी मागील 3 मालिकांपैकी 2 मालिकांमध्ये 30 पेक्षा कमी राहिली आहे. वेस्ट इंडिजचा भारत दौरा आणि न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान विराटला 30 पेक्षा कमी सरासरीने धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात ‘विराट’ कामगिरी

ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसरा सामना हा विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 250 वा सामना ठरला. तसेच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 22 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकूण 8 वा तर टीम इंडियाचा तिसरा फलंदाज ठरला.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020, 2nd Odi | ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात कोहलीचा ‘विराट’ कारनामा

India vs Australia 2020, 2nd Odi | कर्णधार कोहलीची ‘विराट’ कामगिरी, मानाच्या पंगतीत स्थान, ठरला तिसरा भारतीय

7 half centuries 839 runs in 24 innings but Virat Kohli failed to score a century

बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...