T2O World Cup 2022 : दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियासमोर मोठे लक्ष्य
आजच्या सामन्यात विशेष म्हणजे आर. अश्विनने एका षटकात तीन बळी घेतले.
रविवारपासून ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक (T2O World Cup 2022) स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्याच्या आगोदर ऑस्ट्रेलियातील काही टीम सोबत सराव सामने सुरु आहेत. आज सुद्धा टीम इंडियाची मॅच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाशी (Western Australia) सुरु आहे, ऑस्ट्रेलियाच्या वेस्टर्न टीमने एक मोठी धावसंख्या उभारली आहे. पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या टीमचा पराभव केला होता.
ऑस्ट्रेलिया वेस्टर्न टीमने आज टीम इंडियासमोर 169 धावाचं टार्गेट ठेवलं आहे. आज टीम इंडियातील फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कारण मागच्या सराव सामन्यात सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली होती.
आजच्या सामन्यात विशेष म्हणजे आर. अश्विनने एका षटकात तीन बळी घेतले. याशिवाय हर्षल पटेलने 2 आणि अर्शदीप सिंगने 1 बळी घेतला आहे.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया स्कोअर
पॉवर प्ले (6 षटके): 54/1 10 षटकात धावसंख्या: 78/1 15 षटकांत धावसंख्या: 127/3 20 षटकांत धावसंख्या: 168/8
सराव सामन्यात भारताची प्लेइंग-11
रोहित शर्मा, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.