Special Report : आईला सरप्राईज भेट देण्यासाठी निघाला होता, डुलकीमुळे गाडीला भीषण अपघात, ऋषभ पंत भविष्यात क्रिकेट खेळू शकेल का?

ऋषभ रुडकी या त्याच्या मूळ गावी जात होता. आईला सरप्राईज भेट देण्यासाठी तो दिल्लीहून निघाला.

Special Report : आईला सरप्राईज भेट देण्यासाठी निघाला होता, डुलकीमुळे गाडीला भीषण अपघात, ऋषभ पंत भविष्यात क्रिकेट खेळू शकेल का?
ऋषभ पंत
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 11:39 PM

नवी दिल्ली : अपघातात ऋषभ पंतच्या पाय आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पहाटे ऋषभ आईला सरप्राईज भेट देण्यासाठी दिल्लीहून त्याच्या गावी निघाला. घर अवघ्या दहा किलोमीटरवर राहिलं असताना अपघात घडला. चार पदरी महामार्गावर हा अपघात झाला. पहाटे साडेचारची ही वेळ होती. ताशी दीडशे किलोमीटरचा वेग होता. गाडी भरधाव वेगात असताना डुलकी लागली. त्यामुळं हा अपघात झाल्याच सांगितलं जातं.

डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनवर कार गेली. प्रचंड वेगानं कार आधी डिव्हायडरवर आदळली.नंतर वाहतूक फलकावर आदळून गाडीच्या ठिणग्या उडाल्या. नंतरच्या काही मिनिटात गाडी पेटून खाक झाली. अपघातानंतर ऋषभ पंत खिडकीतून बाहेर पडला. रस्त्यावरच्या साईडलेनवर पोहचला. भीषण अपघातानं ऋषभचा शर्टही फाटला. लोकांनी त्याला धीर देऊन उभं केलं.

अंगावर चादर दिली. त्यानंतर दवाखान्यात नेलं. हरियाणा रोडवेज वरच्या सुशील नावाच्या चालकानं मोठी मदत केली. गाडीत काही पैसे होते. ते रस्त्यावर विखुरले गेले. लोकांनी जमा करून ते पैसे जमा केले. ८० लाख रुपये किमतीची मर्सिडीज कार होती. अपघातानंतर कारचा चुराडा झाला. रक्तस्त्राव सुरू असल्यानं तसेच चादर असल्यानं अनेकांनी ऋषभला ओळखलं नाही.

ऋषभ रुडकी या त्याच्या मूळ गावी जात होता. आईला सरप्राईज भेट देण्यासाठी तो दिल्लीहून निघाला. अपघात घडला तिथून ऋषभच्या घराचं अंतर फक्त दहा किलोमीटर होतं. प्रचंड वेग आणि डोळ्यावर आलेल्या वेगामुळं नियंत्रण सुटलं. आता तो क्रिकेट खेळू शकणार की नाही, हे नंतरच कळेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.