बांगलादेश संघाचा वनडे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विजय, 1986 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी करण्यात यश
बांगलादेशनं वनडे इतिहासात पहिल्यांदाच मोठा विजय मिळवला आहे. 37 वर्षानंतर असं यश बांगलादेशच्या वाटेला आलं आहे. यापूर्वी इंग्लंडला टी 20 मालिकेत 3-0 ने क्लिन स्वीप दिला होता.
मुंबई : बांगलादेश हा संघ क्रिकेटमधला लिंबूटिंबू संघ म्हणून गणला जातो. बांगलादेशच्या नावावर एकही आयसीसी चषक नाही. असं असलं तरी गेल्या काही वर्षात बांगलादेश क्रिकेटमध्ये सुधारणा दिसत आहे. बलाढ्य संघांना पराभवाचं पाणी पाजत स्पर्धेतून बाहेर केलं आहे. आता बांगलादेश संघानं वनडे क्रिकेट इतिहासात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 1986 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या बांगलादेशनं आयर्लंडवर मोठा विजय मिळवला आहे. 37 वर्षानंतर पहिल्यांदाच वनडेत 10 गडी राखून विजय मिळवला आहे.
बांगलादेशनं आयर्लंडविरुद्धचा तिसरा सामना 10 गडी राखून जिंकला आहे. या विजयासह तीन सामन्यांची मालिका आपल्या खिशात घातली आहे. पहिला सामना बांगलादेशनं जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला. तिसऱ्या सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवत मालिका 2-0 ने खिशात घातली.
आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यु बालबर्नी याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आयर्लंडचा संपूर्ण संघ 28.1 षटकात 101 धावा करून बाद झाला. संघातील नऊ खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाही. आयर्लंडने बांगलादेशसमोर विजयासाठी 102 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
Modhumoti Bank Limited ODI Series: 3rd ODI | Bangladesh vs Ireland
Bangladesh win the three-match series 2-0 ?
Modhumoti Bank Limited Player of the Match:Hasan Mahmud of Bangladesh 5/32 Wickets
Modhumoti Bank Limited Player of the Series:Mushfiqur Rahim of Bangladesh pic.twitter.com/a8uP7hYJXJ
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 23, 2023
बांगलादेशकडून हसन महमूदने 5, तस्किन अहमदने 3 आणि एबादत हुसैनने दोन गडी बाद केले. 102 धावांचं लक्ष गाठताना तमीम इकबाल आणि लिटन दास जोडी मैदानात उतरली. तमीमने 41 चेंडूत नाबाद 41 आणि लिटन दासने 38 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने नाबात 51 धावा केल्या.
बांगलादेशनं 13.1 षटकात दहा गडी राखून विजयी लक्ष्य गाठलं. बांगलादेशनं पहिल्यांदाच दहा गडी राखून वनडे इतिहासात ही कामगिरी केली आहे. या मालिकेत बांगलादेशनं 183 धावांनी विजय मिळवला होता. इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचीही पहिलीच वेळ होती.
बांगलादेशनं यापूर्वी इंग्लंडला टी 20 मध्ये क्लिन स्वीप दिला होता. पहिला सामन्यात 6 विकेट्सने, दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने आणि तिसऱ्या सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला होता. इंग्लंडला 3-0 ने पराभवाची धूळ चारली होती. बांगलादेशची टी 20 क्रिकेटमधली मोठी कामगिरी होती. विशेष म्हणजे इंग्लंडने 2022 साली वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती.
दोन्ही संघाचे खेळाडू
आयर्लंडचा संघ – स्टीफन डोहेनी, पॉल स्टिर्लिंग, अँड्र्यु बालबिर्नी (कर्णधार), हॅरी टेक्टर, लोरकन टकर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डोक्रेल, अँडी मॅकब्रिन, मार्क एडेर, ग्रॅहम हुम, मॅथ्यु हुम्फ्रेस
बांगलादेशाच संघ – तमीम इकबाल (कर्णधार), लिटन दास, नजमुल होसैन शांतो, मुशफिकर रहिम, शाकिब अल हसन, तोवहीद ह्रिदोय, मेहिदी हसन, तस्किन अहमद, हसन मुहम्मद, एबादत होसैन, नसुम अहमद