IND vs SA 2nd t20 : गगनचुंबी षटकार मारल्यानंतर विराटच्या नावावर नवा रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाला विजय मिळविता आला.
तीन वर्षात विराट कोहलीकडून (Virat Kohli) एकही शतक झालं नव्हतं. त्याचबरोबर त्याच्याकडून चांगली खेळी होतं नव्हती. म्हणून चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media)त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु केली होती. विराट कोहली हा एक असा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे, की त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेकदा चांगली खेळी केली आहे. त्यामुळे त्याचे चाहते देशभरात आहेत. सोशल मीडियावर त्याच्या खासगी आयुष्यावर सुध्दा अनेक पोस्ट असतात. त्या त्याच्या चाहत्यांना (Cricket Fan) अधिक आवडतात.
आशिया चषकात विराट कोहलीच्या नावावर अधिक धावा काढण्याचा रेकॉर्ड झाला आहे. तसेच त्याने तीन वर्षानंतर एक शतक ठोकले आहे. त्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाला विजय मिळविता आला. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत सुद्धा तो चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
काल टीम इंडियाचा दुसरा सामना गोवाहाटीत पार झाला. कालच्या सामन्यात विराट कोहलीने 28 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने 49 धावाा काढल्या. कालच्या सामन्यात सगळ्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
गोहाहाटीत झालेल्या सामन्यात विराट कोहलीने एक षटकार लगावला आणि त्याच्या 11 हजार धावा पुर्ण झाल्या. T20 सामन्यामध्ये सर्वात अधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू आहे. तसेच जगातील चौथा खेळाडू बनला आहे.