टीम इंडियाचा सर्वांत जास्त शिकलेला क्रिकेटर, ज्याला भारताचा ग्रेन मॅक्ग्रा म्हटलं गेलं, पण पुढे…
आजी माजी भारतीय क्रिकेटपटूंचं शिक्षण किती झालंय, हे अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. किंबहुना आतापर्यंतच्या क्रिकेटर्सपैकी सगळ्यात जास्त शिकलेला क्रिकेटर कोण? असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तर त्याचं उत्तर आहे मुंबईकर आविष्कार साळवी! (aavishkar Salvi Most Educated Indian Cricketer)
भारताचा माजी वेगवान गोलंदाज अविष्कार साळवी याचा जन्म 20 ऑक्टोबर 1981 रोजी मुंबईमध्ये झाला. अविष्कार साळवीने क्रिकेटबरोबरच शिक्षणालाही तेवढंच महत्त्व दिलं. आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नसली तरी त्याने आपले शिक्षण मोठ्या खुबीने पूर्ण केली मोठे केले. त्याने अॅस्ट्रोफिजिक्समध्ये पीएचडी पूर्ण केली. तो भारतातील आतापर्यंतचा सर्वात शिकलेला क्रिकेटपटू मानला जातो.
Follow us
आजी माजी भारतीय क्रिकेटपटूंचं शिक्षण किती झालंय, हे अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. किंबहुना आतापर्यंतच्या क्रिकेटर्सपैकी सगळ्यात जास्त शिकलेला क्रिकेटर कोण? असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तर त्याचं उत्तर आहे मुंबईकर आविष्कार साळवी!
भारताचा माजी वेगवान गोलंदाज अविष्कार साळवी याचा जन्म 20 ऑक्टोबर 1981 रोजी मुंबईमध्ये झाला. अविष्कार साळवीने क्रिकेटबरोबरच शिक्षणालाही तेवढंच महत्त्व दिलं. आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नसली तरी त्याने आपले शिक्षण मोठ्या खुबीने पूर्ण केली मोठे केले. त्याने अॅस्ट्रोफिजिक्समध्ये पीएचडी पूर्ण केली. तो भारतातील आतापर्यंतचा सर्वात शिकलेला क्रिकेटपटू मानला जातो.
2001-2002 रणजी मोसमात साळवीने मुंबईकडून प्रथम श्रेणीत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो सुरुवातीला राखीव गोलंदाज म्हणून संघाला आला आणि लवकरच तो संघाचा मुख्य गोलंदाज बनला. उंची आणि अॅक्शनमुळे त्याला गोलंदाजीला धार होती. बाऊन्स तर तो अगदी अप्रतिम फेकायचा. त्यामुळे भारतीय संघात त्याचा प्रवेश झाला.
आविष्कार साळवीने 2003 मध्ये बांगलादेश दौर्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 7 षटकांत केवळ 15 धावा देऊन 2 गडी बाद केले. यावेळी त्याने आपल्या अॅक्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याची गोलंदाजीची अॅक्शन ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा सारखीच होती आणि यामुळे भारताचा मॅक्ग्रा म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं.
2003 मध्येच त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला फुलस्टॉप मिळाला. साळवी फक्त 4 एकदिवसीय सामने खेळू शकला, ज्यामध्ये त्याला 4 विकेट्स मिळाल्या. टीम इंडियामध्ये त्याचं पुनरागमन झालं नाही. दुखापतीमुळे प्रथम श्रेणी कारकीर्दही पुढे बहरली नाही. 2009 मध्ये आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला, जिथे त्याला मॅक्ग्राबरोबर गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याने फक्त 7 आयपीएल सामने खेळले आणि 7 विकेट्स घेतल्या. 2013 मध्ये त्याने शेवटचा देशांतर्गत सामना खेळला.