IPL 2021 : ‘महामानव चेन्नईत पोहोचला’, आरसीबीचं धमाल ट्विट, आयपीएल गाजवण्यासाठी डिव्हिलियर्स सज्ज!
बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीच्या साथीने प्रतिस्पर्धी संघाच्या बोलर्सला तुडवायचं, बॉल सीमापार धाडायचे-स्टेडियमच्या बाहेर फेकायचे, हे डिव्हिलिअर्सला चांगलं जमतं. | AB de Villiers Joins RCB in Chennai training Camp
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) तडाखेबाज फलंदाज ए बी डिव्हिलियर्स (AB de Villiers) 9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2021) रणसंग्रामाआधी बंगळुरु (Royal Challengers Banglore) संघाला जॉइन झाला आहे. मागील अनेक सिझन डिव्हिलियर्स बंगळुरुकडून खेळतो. बंगळुरुसाठी तो अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. महामानव चेन्नईत पोहोचला, असं ट्विट करुन डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये धमाल करण्यास सज्ज असल्याचं एक प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सांगितलं आहे. (AB de Villiers Joins RCB in Chennai training Camp)
आरसीबीचं ट्विट :
BREAKING THE INTERNET :
The spaceship has landed! ?
AB de Villiers has joined the RCB bubble in Chennai. ?#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #AllInForAB pic.twitter.com/pnvXGVl8ww
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 1, 2021
बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीच्या साथीने प्रतिस्पर्धी संघाच्या बोलर्सला तुडवायचं, बॉल सीमापार धाडायचे-स्टेडियमच्या बाहेर फेकायचे, हे डिव्हिलिअर्सला चांगलं जमतं. डिव्हिलियर्स खेळपट्टीवर असल्यावर कितीही अवघड वाटणारं लक्ष्य सोपं वाटतं. कारण त्याने त्याच्या बॅटिंगने अशक्यप्राय आव्हान गाठून दिली आहेत. बंगळुरुला देखील त्याने अनेक मॅच एकहाती जिंकून दिल्यात.
डिव्हिलियर्सची बॅट बोलणं महत्त्वाचं
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत आयपीएलचं जेतेपद मिळवता आलं नाही. विराट, डिव्हिलियर्स असे खेळाडू संघात असताना आणि महत्त्वाचं म्हणजे धावा करत असतानाही कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिलीय. मात्र यंदाच्या मोसमात हाच दुष्काळ दूर करण्यासाठी डिव्हिलियर्सची बॅट बोलणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.
(AB de Villiers Joins RCB in Chennai training Camp)
हे ही वाचा :
IPL 2021 : आयपीएलमध्ये हे 5 बॅट्समन धावांचा पाऊस पाडू शकतात!
IPL 2021 : चेतेश्वर पुजाराचे उत्तुंग षटकार, नेटकरी म्हणतात, धोनीच्या संगतीचा परिणाम?