दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) प्ले ऑफमधील पहिला क्वालिफायर सामना आज (5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार असून 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या क्वालिफायर 1 सामन्यात दिल्ली मुंबईवर वरचढ ठरु शकते, तसेच मुंबईला आव्हान देऊ शकते, असं मत टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी व्यक्त केलं आहे. ability to challenge mumbai indians in delhi capitals said former team india cricketer sanjay bangar
“मी एक गोष्ट सांगतो. एकदा का तुम्ही प्ले ऑफमध्ये प्रवेश केलात, यानंतर साखळी फेरीत तुम्ही काय केलंत, याला महत्व राहत नाही. परिस्थितीनुसार टीम कशी खेळते, याला महत्व असतं. दिल्लीकडे प्ले ऑफ स्पर्धेत खेळण्याचा फार अनुभव नाही. मात्र या मोसमात दिल्लीने दमदार कामगिरी केली आहे, असं संजय बांगर स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात म्हणाले.
“दिल्ली यंदाच्या मोसमात धडाकेबाज सुरुवात केली. मात्र त्यानंतर सलग 4 सामन्यात पराभावाला सामोरे जावे लागले. मात्र साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवत दिल्लीने पॉइंट्सटेबलमधील दुसरं स्थान काबिज केलं. दिल्लीची टीम संमिश्र आहे. त्यांच्याकडे युवा तसेच अनुभवी खेळाडू आहेत. तसेच विदेशी आणि वेगवान गोलंदाज तसेच फिरकीपटूही आहेत. दिल्लीकडे युवाशक्ती तसेच अनुभव अशा दोन्ही गोष्टी आहेत. साखळी फेरीतील 2 सामन्यात मुंबईने दिल्लीला पराभूत केलं. मात्र तरीही दिल्लीकडेच मुंबईला आव्हान देण्याची क्षमता आहे. त्यामुळे मुंबईला सावध राहयला हवं”, असा इशाराही बांगर यांनी मुंबईला दिला.
क्वालिफाय-1 सामन्याबद्दल लिटील मास्टर सुनील गावसकर यांनीही वक्तव्य केलं आहे. “मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यातील क्वालिफाय 1 सामना चुरशीचा होईल. दिल्लीत मुंबईचे 3 खेळाडू आहेत. यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) या तगड्या खेळाडूंचा समावेश आहे. जर या तिनही खेळाडूंनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली, तर मुंबईला विजयासाठी संघर्ष करावा लागेल”, असं गावसकर यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.
“गोलंदाजीच्या बाबतीत मुंबईकडे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) हे वेगवान गोलंदाज आहेत. तर दिल्लीकडे कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि एनरिक नोर्तजे (Anrich Nortje) आहे. तसेच दिल्लीच्या गोटात चतुर रवीचंद्रन आश्विनचा (Ravichandran Ashwin) समावेश आहे. फिरकीपटू अक्षर पटेलला (Axar Patel) पीचकडून मदत मिळाली तर, तो मुंबईसाठी डोकेदुखी ठरु शकतो”, अशी भितीही गावसकर यांनी व्यक्त केली. “मी मुंबईकर आहे. त्यामुळे माझं मन म्हणत की मुंबईचाच विजय होणार. पण मला याबाबत खात्री नाही”, असही गावसकर म्हणाले.
मुंबईटचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्माने हैदराबादविरुद्धच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात पुनरागमन केलं. त्यामुळे मुंबईसाठी हा दिलासा मानला जात आहे. रोहितला हैदराबादविरोधात विशेष काही करता आले नाही. मात्र रोहितच्या पुनरागमनामुळे मुंबईची बाजू आणखी दमदार झाली आहे. रोहितला पंजाबविरुद्धच्या सामन्यात मांड्याच्या स्नायुला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहितला 4 सामन्यांना मुकावे लागले होते.
संबंधित बातम्या :
IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?
ability to challenge mumbai indians in delhi capitals said former team india cricketer sanjay bangar