निकोलस पूरनची तडाखेबंद फलंदाजी; अवघ्या 26 चेंडूंमध्ये कुटल्या 89 धावा
नॉर्दन वॉरियर्सने बांग्ला टायगर्सपुढे विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य उभे केले. | Nicholas Pooran
अबुधाबी: भारताचा क्रिकेटपटू निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने अबू धाबी टी10 लीगमध्ये (Abu Dhabi T10 League) तडाखेबंद फलंदाची करुन सर्वांना अचंबित करुन सोडले आहे. नॉर्दन वॉरियर्सचा कर्णधार असलेल्या निकोलस पूरनने अवघ्या 26 चेंडूत 89 धावा ठोकल्या. त्यामुळे नॉर्दन वॉरियर्सने बांग्ला टायगर्सपुढे विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य उभे केले. त्याच्या या खेळीत तीन चौकार आणि 12 षटकारांचा समावेश आहे. टी10 क्रिकेटमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. (Abu Dhabi T10 Northern Warriors Beat Bangla Tigers By 30 Runs)
बांग्ला टायगर्सने नाणेफेक जिंकून नॉर्दन टायगर्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, त्यांचा हा निर्णय चांगलाच फसला. नॉर्दन वॉरियर्सचा सलामीवीर वसीम मोहम्मद 12 धावा करुन माघारी परतल्यानंतर निकोलस पूरन मैदानात उतरला. त्याने चौथ्या चेंडूवरच षटकार लगावला. तर चौथ्या षटकात अहमदच्या गोलंदाजीवर निकोलसने तीन षटकार आणि एक चौकार मारत 23 धावा वसूल केल्या. त्यानंतर मोहम्मद इरफानच्या गोलंदाजीवरही त्याने तीन षटकार लगावले. तर मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर षटकार लगावत निकोलस पुरनने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
सहा चेंडूत 32 धावा
बांग्ला टायगर्सकडून आठवे षटक जॉर्ज गॉर्टनने टाकले. या षटकात निकोलस पूरनने चौकार आणि षटकारांची अक्षरश: लयलूट केली. त्याने अवघ्या सहा चेंडूत 32 धावा ठोकल्या. त्यामुळे 18 चेंडूत 56 धावा करणाऱ्या निकोलस पूरनची वैयक्तिक धावसंख्या 24 चेंडूत 88 वर जाऊन पोहोचली. शतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या 14 धावा हव्या असताना निकोलस पूरन बाद झाला. आंद्रे फ्लेचरने त्याचा झेल पकडला. नॉर्दन वॉरियर्सकडून लेंडल सिमन्सनेही 22 चेंडूत 41 धावा फटकावल्या.
सर्वाधिक षटकारांचा विक्रम
लेंडल सिमन्स आणि निकोलस पूरन लागोपाठच्या चेंडंवूर बाद झाल्याने नॉर्दन वॉरियर्सला शेवटच्या षटकात 20 धावाच करता आल्या. अन्यथा नॉर्दन वॉरियर्सची धावसंख्या आणखी वाढली असती. निकोलस पूरनने या सामन्यात एकूण 12 षटकार लगावत आपलाच विक्रम मोडीत काढला. यापूर्वी 2018 मध्ये निकोलस पूरनने 10 षटकार लगावले होते. 2019 मध्ये निकोलसने नाबाद 91 धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या :
Union Budget 2021 Marathi LIVE : प्रत्येक भारतीयाला माझे झुकून नमन : निर्मला सीतारमण
IPL 2021 | ठरलं, आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातच
IPL 2021 Auction Date | IPL 2021 च्या लिलावाची जय्यत तयारी, तारीख आणि ठिकाण ठरलं
(Abu Dhabi T10 Northern Warriors Beat Bangla Tigers By 30 Runs)