भारताची ‘फुलराणी’ राजकीय मैदानात, बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजपप्रवेश

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सायना नेहवालच्या रुपाने भाजपला 'स्टार प्रचारक' मिळाला आहे

भारताची 'फुलराणी' राजकीय मैदानात, बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजपप्रवेश
Follow us
| Updated on: Jan 29, 2020 | 12:57 PM

नवी दिल्ली : भारताची ‘फुलराणी’ अर्थात प्रख्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal to Join BJP) राजकारणाच्या ‘कोर्टात’ उतरली आहे. राजधानी दिल्लीत सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला. सायनासोबतच तिची बहीण चंद्रांशू हिनेही भाजपचा झेंडा हाती धरला.

सायनाच्या रुपाने आणखी एक क्रीडापटू राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सायनाच्या रुपाने भाजपला ‘स्टार प्रचारक’ मिळाला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, कैलाश विजयवर्गीय आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत सायना नेहवालचा भाजपप्रवेश झाला.

क्रिकेटपटू गौतम गंभीरने नुकतीच भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवून खासदारकी मिळवली होती. तर कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांनीही भाजपचा झेंडा हाती धरला आहे. त्यानंतर आता सायनाही भाजपमध्ये नशीब आजमावणार आहे.

मोदी सरकारने 2016 मध्ये ‘पद्मभूषण’ने सायना नेहवालचा सन्मान केला आहे. याआधी तिला अर्जुन पुरस्कार (2009), राजीव गांधी खेल रत्न (2009-2010), पद्मश्री (2010) हे सन्मान प्राप्त झाले आहेत.

सायनाने 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं होतं. हा मान पटकावणारी सायना ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती. सायनाने 22 सुपर सीरिज आणि ग्रँडप्रिक्स किताब पटकावले आहेत. 2012 मधील लंडन ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं.

29 वर्षीय सायना नेहवालचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिचा पती पारुपल्ली कश्यपही प्रख्यात बॅडमिंटनपटू आहे. सायनाच्या आयुष्यावर लवकरच चित्रपटही येणार आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित ‘सायना’ चित्रपटात अभिनेत्री परिणिती चोप्रा मुख्य भूमिका करणार आहे.

Saina Nehwal to Join BJP

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.