IndvsAus भारताकडे 166 धावांची आघाडी

अॅडलेड: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या अॅडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी, भारताने 3 बाद 151 अशी मजल मारली आहे. त्यामुळे भारताची आघाडी पहिल्या डावातील 15 धावांमुळे 166 पर्यंत वाढली आहे.  आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा 40 आणि अजिंक्य रहाणे 1 धावांवर खेळत होते. भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 235 धावांवर गुंडाळल्यामुळे भारताला पहिल्या डावात 15 धावांची […]

IndvsAus भारताकडे 166 धावांची आघाडी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अॅडलेड: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या अॅडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी, भारताने 3 बाद 151 अशी मजल मारली आहे. त्यामुळे भारताची आघाडी पहिल्या डावातील 15 धावांमुळे 166 पर्यंत वाढली आहे.  आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा 40 आणि अजिंक्य रहाणे 1 धावांवर खेळत होते. भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 235 धावांवर गुंडाळल्यामुळे भारताला पहिल्या डावात 15 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. मुरली विजय आणि के एल राहुल यांनी 63 धावांची सलामी दिली. ही जोडी टिकली असं वाटत असतानाच मिचेल स्टार्कने मुरली विजयला हॅण्डस्कोम्बकरवी झेलबाद केलं. मुरली विजयने 18 धावा केल्या.

विजय बाद झाल्यानंतर राहुलच्या साथीला हुकमी चेतेश्वर पुजारा आला. पुजाराने सावध खेळी सुरु केली तर राहुलने खराब चेंडूंवर हल्ला चढवला. के एल राहुल अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना, त्याला हेजलवूडने पॅट कमीन्सकरवी 44 धावांवर झेलबाद केलं. राहुलने 67 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 44 धावा केल्या.

यानंतर कर्णधार विराट कोहली फलंदाजीला आला. कोहलीने आधी परिस्थितीचा अंदाज घेतला. कठीण चेंडू सोडून देणं पसंत केलं. शिवाय कोहलीने एकेरी धावा घेणं सुरु ठेवलं. कोहली आणि पुजाराची जोडी सेट झाली असं वाटत होतं. मात्र आजच्या खेळाला केवळ 4 षटकं शिल्लक असताना कोहली माघारी परतला. नॅथन लायनने त्याला बाद केलं. कोहलीने 104 चेंडूत 3 चौकारांसह 34 धावा केल्या.

तत्पूर्वी आजच्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने 7 बाद 191 वरुन केली.  ट्रेविस हेडने कालच्या 61 धावांमध्ये आज 11 धावांची भर घालून तो माघारी परतला. त्याने 72 धावा केल्या. त्याला तळाच्या फलंदाजांची साथ लाभली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 235 धावांपर्यंत मजल मारता आली.  ऑस्ट्रेलियाला 235 धावांत गुंडाळल्यामुळे भारताला पहिल्या डावात 15 धावांची आघाडी मिळाली.

भारताकडून आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत धाडलं.

संबंधित बातम्या 

IndvsAus : ऑस्ट्रेलियाने झुंजवलं, पहिला डाव 235 धावांत आटोपला 

IndvsAus: ऑस्ट्रेलियाच्या ‘हेड’मुळे भारताला डोकेदुखी! 

ख्वाजाने हवेत उडी मारुन झेल घेतला, विराटही पाहत राहिला!  

फक्त 37 धावा केल्या, पण रोहितने आफ्रिदीचा सर्वात मोठा विक्रम मोडला  

अॅडलेड कसोटी : पुजाराच्या शतकाने भारताची लाज राखली!  

पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार 

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.