हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे”, अफगाणिस्‍तानचा बांग्‍लादेशला इशारा

अफगानिस्‍तानने विश्वचषकात आतापर्यंत 6 सामने खेळले मात्र, त्यापैकी एकातही त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यांच्या याच कामगिरीमुळे ते विश्वचषक गुणतालिकेत सर्वात तळाला आहेत.

हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे”, अफगाणिस्‍तानचा बांग्‍लादेशला इशारा
Follow us
| Updated on: Jun 24, 2019 | 11:50 AM

लंडन: अफगाणिस्‍तानने विश्वचषकात आतापर्यंत 6 सामने खेळले मात्र, त्यापैकी एकातही त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यांच्या याच कामगिरीमुळे ते विश्वचषक गुणतालिकेत सर्वात तळाला आहेत. आज (24 जून) त्यांचा सामना बांग्‍लादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तान आपला पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबने बांग्लादेशला शेरो-शायरी करत इशारा दिला आहे.

पत्रकार परिषदेत नैबला बांग्‍लादेशविषयी प्रश्न करण्यात आल्यावर तो म्हणाला, “हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे.” विश्वचषकात सलग 6 सामने जिंकलेल्या अफगाणिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या सर्व आशा मावळल्या आहेत. दुसरीकडे 5 गणांसह बांग्लादेशचा संघ देखील जवळजवळ सेमीफायनलमधून बाहेर पडल्यात जमा आहे. मात्र. बांग्लादेशने पुढील तिन्ही सामने जिंकल्यास आणि इतर काही सामन्यांचे निकाल बांग्लादेशच्या सोयीचे लागल्यास बांग्लादेश अंतिम 4 संघांमध्ये प्रवेश करु शकतो.

गोलंदाजी हीच बांग्‍लादेशची खरी अडचण

बांग्लादेशची फलंदाजी दमदार राहिली आहे. अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन तर जोरदार फॉर्ममध्ये आहे. सर्वात अधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंमध्येही त्याचा समावेश आहे. मात्र, बांग्लादेशची गोलंदाजी कर्णधार मशरफे मुर्तजाच्या काळजीचे कारण आहे. अफगाणिस्तानला टक्कर द्यायची असेल, तर बांग्लादेशच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. तरच बांग्लादेशला या सामन्यावर विजय मिळवता येईल.

अफगाणिस्तानचा संघ

गुलबदीन नैब (कर्णधार), नूर अली जादरान, हजरतुल्लाह जादरान, असगर स्टानिकजाई, हजरतुल्लाह जाजई, हसमतुल्लाह जादरान, राशिद खान, दौलत जादरान, अफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान, रहमत शाह, समिउल्लाह शिनवारी, मोम्मद नबी, मोहम्मद शाहजाद, इकराम अली (यष्टीरक्षक).

बांग्लादेश: मशरफे मुर्तजा (कर्णधार), तमीम इकबाल, सौम्य सरकार, शब्बीर रहमान, रुबेल हुसैन, मुस्तफिजुर रहमान, अबु जायेद, महमदुल्ला, मोहम्मद सैफुद्दीन, मोसद्दक हुसैन, शाकिब अल हसन, मेहंदी हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मुश्फीकुर रहीम (यष्टीरक्षक), मोहम्मद मिथुन.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.