Shahid Afridi : आफ्रिदीने विराट कोहलीला दिला निवृत्तीचा सल्ला, भारतीय खेळाडू भडकला
अमित मिश्राने उत्तर दिलेलं ट्विट सोशल मीडियावर सद्या अधिक व्हायरल झालं आहे. त्यावर अनेक लोकांनी कमेंट केलं आहे.
टीम इंडीया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात ज्यावेळी सामने व्हायचे, त्यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानात संघर्ष पाहायला मिळायचा. त्यामध्ये सगळ्या खेळाडूंचा संघर्ष मॅच दरम्यान पाहायला मिळाला आहे. नुकत्याचं झालेल्या आशिया चषकात (Asia Cup 2022) टीम इंडीयाच्या पाकिस्तानसोबत दोन मॅच झाल्या. त्यावेळी सुद्धा दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. विराट कोहली सद्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याला आफ्रिदीने निवृत्तीचा सल्ला दिला आहे.
Dear Afridi, some people retire only once so please spare Virat Kohli from all this. ?? https://t.co/PHlH1PJh2r
हे सुद्धा वाचा— Amit Mishra (@MishiAmit) September 13, 2022
ज्यावेळी शायद आफ्रिदी क्रिकेट खेळत होता. त्यावेळी आफ्रिदीला अनेकदा क्रिकेट चाहत्यांनी वेगवेगळ्या कारणांनी ट्रोल केलं आहे. सद्या विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ही वेळ त्यांच्या निवृत्तीसाठी योग्य आहे, असं आफ्रिदीने म्हटलं आहे.
टीम इंडीयाचा गोलंदाज अमित मिश्रा याने आफिद्रीला उत्तर दिलं आहे. “प्रिय आफ्रिदी, काही लोक फक्त एकदाच निवृत्त होतात, म्हणून कृपया विराट कोहलीला या सगळ्यापासून वाचवा असं उत्तर दिलं आहे.
अमित मिश्राने उत्तर दिलेलं ट्विट सोशल मीडियावर सद्या अधिक व्हायरल झालं आहे. त्यावर अनेक लोकांनी कमेंट केलं आहे.
पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात विश्वचषकाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड झाल्यापासून पुन्हा सोशल मीडियावर चर्चा वाढली आहे.