T20 World Cup 2022 : अफ्रिदीच्या भेदक चेंडूने अफगाणिस्तानचा फलंदाज जखमी
पाकिस्तान टीमकडे चांगले जलदगती गोलंदाज आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी एखाद्या सामन्यात पकड मिळवितात
ऑस्ट्रेलियात (Australia) मागच्या रविवारपासून क्रिकेटचा (Cricket) रणसंग्राम सुरु झाला आहे. विशेष म्हणजे सगळ्यांच्या नजर आपल्या टीमकडे लागल्या आहेत. सध्या टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण दोन्ही टीममध्ये नेहमी संघर्ष पाहायला मिळाला आहे.
पाकिस्तान टीमकडे चांगले जलदगती गोलंदाज आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी एखाद्या सामन्यात पकड मिळवितात. त्यांचा भरवशाचा गोलंदाज म्हणजे शाहिन आफ्रिदी त्याने ऑस्ट्रेलियात झालेल्या सराव सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजाला जखमी केले आहे.
सराव सामना सुरु असताना पहिल्या ओव्हरमध्ये अफ्रिदीचा एक चेंडू थेट अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज़च्या पायावर जाऊन पडला. त्यावेळी तो एकदम डगमगला कारण चेंडूचा वेग अधिक होता.
SHAHEEN pic.twitter.com/WR1BPa1Z8V
— adi✨|| haris rauf cheerleader (@adidoescricket) October 19, 2022
रहमानुल्लाह गुरबाज़ याला अंपायरने आऊट दिले. परंतु चेंडू लागल्याने त्याला चालता येत नव्हते. त्यानंतर सहकाऱ्यांनी पाठीवर घेऊन पॅव्हेलियनमध्ये नेले.
tell em Shaheen SHAH AFRIDI WAS HERE pic.twitter.com/S5ewHii3lg
— ✨ (@gayomarlic) October 19, 2022
पाकिस्तान टीम
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.
अफगाणिस्तान टीम
मोहम्मद नबी (कर्णधार), राशिद खान, रहमानउल्ला गुरबाज, नजीबुल्ला झदरन, अजमतुल्ला उमरझाई, दरवेश रसुली, फरीद अहमद, फझलहक फारुकी, हजरतुल्ला झाझाई, इब्राहिम झदरन, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, कैस अहमद, सलीम साफी उस्मान गनी.