Yuvraj Singh : युवराज सिंगने मुलाला दाखवला मैदानातला तो ऐतिहासिक क्षण
त्यावेळी युवराज सिंगच्या नावावर अनोखे रेकॉर्ड झाले होते.
पंधरा वर्षापुर्वी युवराज सिंग (Yuvraj Singh) नावाचं वादळ क्रिकेट मैदानात (Criket Maidan) पाहायला मिळालं होतं. आज त्या ऐतिहासिक क्षणाला 15 वर्षे पुर्ण झाली आहेत. इंग्लंड (England) विरुद्धच्या सामन्यात एक नवं रेकॉर्ड नोंदवलं गेलं आहे. स्टुअर्ट ब्रॉर्ड हा गोलंदाजी करीत असताना युवराज सिंगने सलग सहा षटकार लगावले आहेत.
Couldn’t have found a better partner to watch this together with after 15 years ? ? #15YearsOfSixSixes #ThisDayThatYear #Throwback #MotivationalMonday #GetUpAndDoItAgain #SixSixes #OnThisDay pic.twitter.com/jlU3RR0TmQ
हे सुद्धा वाचा— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) September 19, 2022
आजच्या दिवशी ही घटना घडली होती. त्यामुळे ही मॅच भारतीय चाहत्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिलं अशी होती. त्यावेळी युवराज सिंगच्या नावावर अनोखे रेकॉर्ड झाले होते.
आज ती ऐतिहासिक मॅच युवराज सिंगने मुलासोबत पाहिली, तसेच मॅच पाहत असलेला व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच यांच्यासारखा जोडीदार मॅच पाहायला मिळाला नसता, असंही त्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे.
सद्या युवराज सिंगचं ट्विट सोशल मीडियावर अधिक व्हायरल झालं आहे. युवराज सिंगचे चाहते आजही त्यांचं कौतुक करीत आहे. काही नेटकऱ्यांनी आम्ही अजूनही पाहतो असं लिहिलं आहे. तर काही नेटकरी म्हणतात आम्ही ती मॅच कधीचं विसरु शकत नाही.