Video : भारताने हरवल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्याने फोडला टीव्ही, सेहवाग म्हणाला…
कालच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमचा पराभव झाल्यानंतर चाहते एकदम निराश झाल्याचे पाहायला मिळाले.
मेलबर्न : टीम इंडियाची (Team India) आणि पाकिस्तानची (Pakistan) मॅच काल झाल्यानंतर इंडियातील चाहते एकदम खूश झाले, तर पाकिस्तानचे चाहते निराश झाल्याचं पाहायला मिळालं. कालची मॅच रोमांचक झाल्याने चाहत्यांना अधिक मज्जा आल्याची सुध्दा सोशल मीडियावर (Social Media) चर्चा आहे. कारण कालच्या मॅचनंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी जोरदार फटाके वाजवून आनंद साजरा केला आहे.
Relax Padosi , it’s only a game. Hamaare yahan Deepawali hai toh pataakhe phod rahe hain aur aap bevajah TV ? phod rahe hain ?.
हे सुद्धा वाचाNahin yaar, TV ka kya kasoor. pic.twitter.com/AvVL4fOmny
— Virender Sehwag (@virendersehwag) October 23, 2022
कालच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमचा पराभव झाल्यानंतर चाहते एकदम निराश झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राग व्यक्त केला. तर एका चाहत्याने टिव्ही फोडला असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. तो व्हिडीओ कुठला आहे अद्याप स्पष्ट आहे. पण त्यामध्ये मॅच पाहताना एकाने टीव्ही फोडला आहे.
विराट कोहली आणि हार्दीक पांड्या या जोडीने कालच्या सामन्यात चांगली बॅटिंग केली. त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.