Mohammed Shami : मोहम्मद शमीनंतर आता हा खेळाडूही कोविड पॉझिटिव्ह
विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये निवड झालेल्या मोहम्मद शमी या जलदगती गोलंदाजाला कोरोना झाल्याची माहिती त्याने दिली होती.
कोरोनाच्या (Corona) संसर्गाने आत्तापर्यंत अनेकांचे बळी घेतले, तसेच अनेकांचं दोन वर्षात नुकसान सुद्धा केलं आहे. कोरोना पुर्णपणे संपुष्टात आला नसून त्याची आजही अनेकांना लागण होत आहे. परंतु सध्या कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याची माहिती मिळत आहे. सध्या कोरोनाची खेळाडूंना (Player) व्हायला सुरुवात झाली आहे. मोहम्मद शमीनंतर (Mohammed Shami) आणखी एका खेळाडूला कोरोना झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये निवड झालेल्या मोहम्मद शमी या जलदगती गोलंदाजाला कोरोना झाल्याची माहिती त्याने दिली होती. तो सध्या कोरोना आजारावरील उपचार जवळच्या रुग्णालयात घेत आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतून त्याने माघार घेतली आहे.
आता आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. तो खेळाडू सध्याचा त्या टीमसा. कारण त्याने पाकिस्तानच्या टीमसाठी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या नसीम शाहची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
दोन दिवसापुर्वी नसीम शाह याला प्रचंड ताप आल्याची माहिती व्हायरल झाली होती. त्यानंतर एका हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी ज्यावेळी त्याची कोरोना चाचणी केली त्यावेळी तो नसीमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
पाकिस्तानच्या टीमचा खेळाडू नसीम शाह आजारी असल्यामुळे त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.