IPL रंगणार खरी पण विदेशी खेळाडूंचे धक्के सुरुच, आता बांगलादेशच्या या दोन खेळाडूंचा उर्वरित सामन्यांना रामराम!

बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) उर्वरित मॅचेस सुरु करण्याचा निर्णय घेतला खरा पण आता अनेक विदेशी खेळाडू आयपीएलच्या उर्वरित मॅचेसमधून माघार आहेत. (After pat Cummins Shakib Al hasan And mustafizur Rahman Wouldnt play IPL 2021)

IPL रंगणार खरी पण विदेशी खेळाडूंचे धक्के सुरुच, आता बांगलादेशच्या या दोन खेळाडूंचा उर्वरित सामन्यांना रामराम!
शाकिब अल हसन आणि मुस्तफिजूर रहमान
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 2:20 PM

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) उर्वरित मॅचेस सुरु करण्याचा निर्णय घेतला खरा पण आता अनेक विदेशी खेळाडू आयपीएलच्या उर्वरित मॅचेसमधून माघार आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवागन गोलंदाज पॅट कमिन्सने (Pat Cummins) आयपीएलच्या उरलेल्या मॅचेसमध्ये न खेळण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. आता त्याच्याच पावलावर बांगलादेशच्या खेळाडूंनी पाऊल टाकलंय. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान (Mustafijur Rahman) आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) या दोघांनी आयपीएलच्या उर्वरित मॅचेसना रामराम ठोकणार आहेत. (After Pat Cummins Shakib Al Hasan And Mustafizur Rahman Wouldnt play IPL 2021)

खेळाडूंना आयपीएल खेळायला परवानगी नाही

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) स्पष्ट केले आहे की, बांगलादेशी खेळाडूंना उर्वरित सामने खेळण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्ड ना हरकत प्रमाणपत्र देणार नाही. याचाच अर्थ शाकिब अल हसन आणि मुस्तफिजूर रहमान हे दोघेही उर्वरित आयपीएल सामन्यात खेळू शकणार नाही. शाकिब अल हसन केकेआरकडून खेळतो आणि तर मुस्तफिजूर रहमान राजस्थानकडून खेळतोय.

IPL 2021: परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी BCCI ची धडपड, ‘या’ खास रणनीतीचा वापर

…म्हणून खेळाडूंना NOC नाही!

हे दोन्ही खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळले होते आणि बीसीबीने (bangladesh Cricket Board) त्यांना 18 मेपर्यंत ना हरकत प्रमाणपत्र (NCO) जारी केलं होती. हे दोन्ही खेळाडू घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध होणऱ्या वन-डे सामन्यात बांगलादेशच्या संघात भाग घेऊ शकतात. त्यामुळे बीसीबीने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. सप्टेंबर महिन्यात इंग्लंडचा संघ बांगलादेश दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसाठी तीन टी -20 सामनेही खेळले जाणार आहेत.

विदेशी खेळाडू घेतायत माघार

बायोबबलमध्ये देखील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याची भूमिका घेतली. 4 मे रोजी आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करण्यात आला. आता भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा पार पडल्यानंतर 10 सप्टेंबरपासून ऑक्टोबर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत आयपीएलच्या उर्वरित मॅचेस खेळवण्याचं बीसीसीआयचं नियोजन आहे. परंतु या स्पर्धेतून विदेशी खेळाडू या ना त्या कारणाने एकापाठोपाठ एक माघार घेतायत.

(After Pat Cummins Shakib Al Hasan And Mustafizur Rahman Wouldnt play IPL 2021)

हे ही वाचा :

इंग्लंड सरकारच्या निर्णयाने विराटसेनेच्या ‘आनंद पोटात माईना…!’

पंजाब किंग्सचा स्फोटक फलंदाज अडकला लग्नबंधनात, बालपणीच्या मैत्रीणीलाच बनवले जीवनसाथी

भारतीय दिग्गजाच्या 18 चेंडूत 88 धावा, मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस, रिषभ पंतशी सातत्याने तुलना

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.