Indian Team : टी20 वर्ल्ड कप तर संपला, आता टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य कोणतं ? कधी होणार पुढचा सामना ?
IND vs ZIM : टी20 वर्ल्ड कप आता संपला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतीय संघाने वर्ल्डकपवर नाव कोरलं. त्यांच्या विजयाचा जल्लोष अद्याप सुरूच असू सोशल मीडियावरही व्हिडीओ, फोटो व्हायरल झाले आहेत. पण आता वर्ल्ड कप नंतर काय ? टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य कोणतं ? चला जाणून घेऊया..
टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवलं आणि टीम इंडियासह करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला. रोहित शर्मा, विराट कोहली, बुमराह, हार्दिक पंड्य यांच्यासह भारतीय संघातील इतर खेळाडू आणि प्रशिक्षक राहलु द्रविड यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तर आलेच पण विजयही त्यांनी दणक्यात साजरा केला.मात्र या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा , विटराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. वर्ल्डकप संपला असला तरी टीम इंडियाचे सेलीब्रेशन अद्यापही कायम आहे. आणि त्यांचा खेळही सुरूच राहणार आहे. आता वर्ल्ड कप नंतर काय ? टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य कोणतं ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. वर्लड चँपियन बनल्यावर टी इंडिया पुढली मॅच कोणाविरुद्ध आणि कधी खेळणार ? चला जाणून घेऊया…
भारतीय संघाचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका शनिवार, 06 जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंऐवजी आपल्याला ज्युनियर आणि आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणारे अनेक खेळाडू धमाकेदार खेळ करताना मिळतील.
संघातील तरूण, स्टार खेळाडू शुबमन गिलकडे झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे. या दौऱ्यावर, काही नवीन खेळाडूंना टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. ज्यांनी आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. या दौऱ्यातील शेवटचा सामना रविवार, 14 जुलै रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी साडेचार वाजता सुरू होतील.
असं आहे संपूर्ण सीरिजचं शेड्यूल
भारत वि. झिम्बाब्वे पहिला सामना – 06 जुलै , शनिवार- हरारे स्पोर्ट्स क्लब
भारत वि. झिम्बाब्वे दूसरा सामना- 07 जुलै, रविवार – हरारे स्पोर्ट्स क्लब
भारत वि. झिम्बाब्वे तिसरा सामना – 10 जुलै, बुधवार- हरारे स्पोर्ट्स क्लब
भारत वि. झिम्बाब्वे चौथा सामना- 13 जुलै, शनिवार- हरारे स्पोर्ट्स क्लब
भारत वि. झिम्बाब्वे पाचवा सामना- 14 जुलै, रविवार- हरारे स्पोर्ट्स क्लब
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी असा असेल भारतीय संघ :
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड़, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेट कीपर), ध्रुव जुरेल (विकेट कीपर), शिवम दुबे, नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, आवेश खान.