IND vs NZ : दुसऱ्या मॅचमध्ये न्यूझिलंडचा पराभव झाल्यानंतर हा खेळाडू करणार टीमचं नेतृत्व
T20 मालिकेतील अंतिम सामन्यात न्यूझिलंडचा कर्णधार विल्यमसन खेळणार नसल्याचे न्यूझिलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
मुंबई : टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड (NZ) टीम यांच्यात सध्या T20 मालिका सुरु आहे. त्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या खेळाडूने कालच्या सामन्यात कमी चेंडूत धुवाधार शतक केलं. विशेष म्हणजे टीम इंडियाची धावसंख्या अधिक असल्यामुळे न्यूझिलंडच्या टीमला धावांचा पाठलाग करता आला नाही. 65 धावांनी टीम इंडियाचा विजय झाला.
T20 मालिकेतील अंतिम सामन्यात न्यूझिलंडचा कर्णधार विल्यमसन खेळणार नसल्याचे न्यूझिलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. विल्यमसन उद्या काही आरोग्याच्या तपासणी करण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे तो पुढच्या मॅचमध्ये खेळणार नाही. पुढच्या मॅचचं नेतृत्व न्यूझिलंड टीमचा दिग्गज गोलंदाज टीम साऊदीकडे देण्यात येणार आहे.
पुढचा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. कारण उद्याचा सामना न्यूझिलंड टीमने जिंकला तर बरोबरी होईल, समजा टीम इंडियाने उद्याचा सामना जिंकल्यास 2-0 असे गुण असतील. त्याबरोबर टीम इंडिया मालिका जिंकेल.
T20 मालिकेनंतर टीम इंडिया न्यझिलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याचं कर्णधारपद शिखर धवनकडे देण्यात आलं आहे. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश, मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, उमरान मलिक
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक सिंह, चहल. कुलदीप सेन, उमरान मलिक
टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.
वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.