पर्थ :विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेतील मोठ्या मॅचेस सुरु झाल्यापासून क्रिकेटची रंगत अधिक वाढली आहे. कारण टीम इंडियाने (Team India) पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला. तसेच काल झालेल्या रोमांचक मॅचमध्ये झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) टीमने पाकिस्तानचा पराभव केला. तेव्हापासून सोशल मीडियावर पाकिस्तानच्या खेळाडूंची अनेकांनी खिल्ली उडविली आहे. यामध्ये आता झिम्बाब्वेचे राष्ट्रपती सुद्धा उतरले आहेत. त्यांनी सुध्दा पाकिस्तानच्या टीमला चांगलचं डिवचलं आहे.
What a win for Zimbabwe! Congratulations to the Chevrons.
कालचा सामना ऑस्ट्रेलियातील पर्थच्या मैदानावर झाला. पहिली मॅच हारल्यामुळे दबावाखाली असलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी झाली नाही. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी सुरुवातीला फलंदाजी केली. जेमतेम धावसंख्या असल्याने पाकिस्तान सहज जिंकेल असं वाटतं होतं. परंतु झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी विकेट घेत पाकिस्तानच्या खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
झिम्बाब्वेचे राष्ट्रपती Emmerson Mnangagwa यांनी क्रिकेटच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच पुढच्या वेळी खऱ्या मिस्टर बीनला पाठवू, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ऐतिहासिक विजयानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनीही घेतला PAK चा आनंद, म्हणाले- पुढच्या वेळी खऱ्या मिस्टर बीनला पाठवू
बनावट मिस्टर बीन उर्फ पाक बीन
‘पाक बीन’नावाचा एक कॉमेडीयन आहे. तो पाकिस्तानातील कराची येथील आहे. त्याचं खरं नाव मोहम्मद आसिफ आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतीचं ते ट्विट विरेंद्र सेहवागने शेअर करीत पाकिस्तानची खिल्ली उडविली आहे.