T20 World Cup 2024 : 17 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार? मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा तोच नजारा; टीम इंडिया ओपन बसमधून…

2024 टी20 वर्ल्ड कप वर नाव कोरल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू लवकरच मायदेशात परतणार आहे. सध्या वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेले खेळाडू खास विमानाने आधी राजधानी दिल्लीत येणार असून नंतर मुंबईत आल्यावर ते ओपन बस टूर करणार असल्याची शक्यता आहे.

T20 World Cup 2024 : 17 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार? मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा तोच नजारा; टीम इंडिया ओपन बसमधून...
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 1:16 PM

2024 टी20 वर्ल्ड कप चा अंतिम सामना शनिवारी पार पडला. दक्षइण आफ्रिकेला हरवून भारतीय संघान वर्ल्डकपवर नाव कोरल्यानंतर भारतात एकच जल्लोष झाला. चाहत्यांचा उत्साह, घोषणा, फटाक्यांची आतिषबाजी यामुळे देशात दुसरी दिवाळीच साजरी झाली. टीम इंडियाने 11 वर्षांनी एखादी आयसीसी ट्रॉफी जिंकून नाव कोरलं आहे. आता भारतीय सघातील खेळाडू लवकरच मायदेशात परतणार असून राजधानी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मुंबईत आल्यावर या ट्रॉफीसह ओपन बसमधून फेरी मारू शकतात. यापूर्वी 2007 धोनीच्या नेतृत्वाखाली टी20 वर्ल्ड कप जिंकल्यावर धोनी अँड कंपनीने असा ‘ओपन बस’ दौरा केला होता. त्याच्या आठवणी क्रिकेट चाहत्यांच्या मनात आजही ताज्या आहेत.

2007 मध्ये जेव्हा टीम इंडियाने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा संपूर्ण देशभरात आनंदाचे, सणाचे वातावरण होतं. त्यावेळू मुंबईत आल्यावर धोनी आणि संघातील इतक खेळाडूंनी एका ओपन बसमधून ट्रॉफी घेऊन परेड केली होती. 2007 साली झालेला टी20 वर्ल्ड कप हा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. फायनलमध्य चुरशीचा सामना झाला आणि भारताने पाकिस्तानला पराभूत करून वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, १७ वर्षांपूर्वी झालेल्या या सोहळ्याची आता पुनरावृत्ती होऊ शकते. बार्बाडोसहून परतल्यानंतर टीम इंडिया खुल्या बसमधून ट्रॉफीसह मुंबईला येऊ शकते, असे वृत्त आहे. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भारतीय खेळाडू बार्बाडोसमध्ये अडकले

भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकल्यामुळे विजयी भारतीय संघाचे देशात स्वागत करण्यासाठी तमाम क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहेत. परंतु अंतिम सामना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजमध्ये धोकादायक चक्रीवादळ आले. यामुळे वेस्ट इंडिजला जाणारी आणि येणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली. आता भारतीय संघाला परत आणण्यासाठी बीसीसीआय चार्टड प्लेन पाठवणार आहे. लवकरच टीम इंडियाचे विमान वेस्ट इंडिजमधून भारतात येण्यासाठी निघण्याची शक्यता आहे. गुरुवारी भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल होणार आहे.

भारताने दुसऱ्यांदा जिंकला T20 वर्ल्डकप

2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कपची पहिली आवृत्ती खेळवण्यात आली होती, ज्यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली होती. यानंतर, मेन इन ब्लूला या फॉरमॅटचे दुसरे विजेतेपद जिंकण्यासाठी 17 वर्षे लागली. मात्र, यादरम्यान भारताने एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

विराटने अनुष्काला व्हिडिओ कॉलवर दाखवली चक्रीवादळाची भीषणता

वेस्ट इंडिजमधील चक्रीवादळाची भीषणता विराटने अनुष्का शर्माला दाखवली आहे. व्हिडिओ कॉल करुन वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेले वेगाने वाहणारे वारे दाखवले. विराट कोहली आणि भारतीय संघ अजूनही वेस्ट इंडिजमध्ये अडकला आहे. चक्रीवादळामुळे हॉटेलमधून बाहेर पडणेही शक्य नाही. त्यामुळे खेळाडू गप्पांमध्ये आणि कुटुंबाशी संवाद साधण्यात वेळ घालवत आहेत. विराट कोहलीने अनिष्काला व्हिडिओ कॉल लावला. त्या माध्यमातून चक्रीवादळाची भीषणता तिला दाखवली. हॉटेलच्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊन किती वेगाने वारे वाहत आहे, ते विराटने दाखवले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.