अजिंक्य रहाणेने शेअर केला बाळाचा पहिला फोटो

अजिंक्य रहाणेने शेअर केलेल्या फोटोमध्ये अजिंक्य स्वतः आणि पत्नी राधिका दिसत आहेत, मात्र बाळाचा चेहरा दिसत नाही.

अजिंक्य रहाणेने शेअर केला बाळाचा पहिला फोटो
Follow us
| Updated on: Oct 07, 2019 | 3:26 PM

मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या बाळाचा पहिला फोटो (Ajinkya Rahane Baby Photo) शेअर केला आहे. अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकरने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

रहाणेने शेअर केलेल्या फोटोमध्ये अजिंक्य स्वतः आणि पत्नी राधिका दिसत आहेत, मात्र बाळाचा चेहरा दिसत नाही. नवरात्रातच रहाणेच्या घरी चिमुकलीचं आगमन झाल्यामुळे रहाणे कुटुंबात जल्लोषाचं वातावरण आहे.

“अजिंक्य, बाबा झाल्याबद्दल तुझे अभिनंदन, तुझी परी आणि तिची आई या दोघीही सुखरुप असतील अशी मी आशा करतो. तुझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आता सुरु झाले आहेत,” असं ट्वीट करत क्रिकेटपटू हरभजन सिंह याने ही गुड न्यूज शेअर केली होती. सोशल मीडियावर अनेक जणांनी अजिंक्य आणि राधिका यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अजिंक्य विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळत असतानाच ही गोड बातमी आली. अजिंक्यने आपण बाबा होणार असल्याचं जुलै महिन्यातच जाहीर केलं होतं. राधिकाच्या डोहाळ जेवणाचे फोटो त्याने ट्विटरवर पोस्ट केले होतो. त्याच्या या फोटोवर अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर हे दोघेही बालपणीचे मित्र-मैत्रिण आहेत. बालपणी एकमेकांचे शेजारी असलेल्या या दोघांमध्ये पुढे घट्ट मैत्री झाली. याच मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झालं.

View this post on Instagram

We’re adding a little more love to our family ❤️

A post shared by Radhika Rahane (@radhika_dhopavkar) on

अजिंक्य आणि राधिकाची मैत्री दोघांच्या घरच्यांनाही माहिती होती. दोघांमध्ये जेव्हा प्रेमसंबंध जुळले तेव्हा ते जास्त काळ लपून राहिले नाही. कुटुंबीयांनीही मग जास्त वेळ न घेता, दोघांचे हात पिवळे करुन टाकले. सप्टेंबर 2014 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले.

संबंधित बातम्या :

अजिंक्य रहाणेच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.