अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजानं यशाचं गुपित केलं उघड, फलंदाजी आणि गोलंदाजीत वापरली ही ट्रिक, पाहा Video
कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला रविंद्र जडेजा, आर. अश्विन आणि अक्षर पटेल डोकेदुखी ठरले आहेत. त्यांच्या अप्रतिम खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने सलग दोन कसोटी सामने गमावले आहेत. या यशाचं गुपित जडेजा आणि अक्षर पटेलनं उघड केलं आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा, आर. अश्विन आणि अक्षर पटेलनं चमकदार कामगिरी केली. या तिघांनी फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर भारताला दोन कसोटीत विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या रविंद्र जडेजानं जोरदार कमबॅक केलं आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली आहे. रविंद्र जडेजाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 22 षटकात 8 निर्धाव षटकं टाकत 47 धावा देत 5 गडी बाद केले होते.त्याचबरोबर रविंद्र जडेजाने पहिल्या डावात 185 चेंडूत 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने 12 षटकात 34 धावा देत 2 गडी बाद केले होते.
रविंद्र जडेजाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 21 षटकात 2 निर्धाव षटकं टाकत 68 धावा देत 3 गडी बाद केले होते. तसेच फलंदाजी करतानाा 74 चेंडूत 26 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात तर रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत धाडला. 12 षटकात 1 निर्धाव षटक टाकत 7 गडी बाद केले. तर अक्षर पटेलनं 74 धावांची जबरदस्त खेळी करत ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला होता. आता या यशाचं गुपित अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजानं एकमेकांना प्रश्न विचारून उघड केलं आहे. नेमकी काय चर्चा झाली पाहा.
From setting the stage on fire & discussing tactics to sharing moments of laughter
The all-round duo of @imjadeja & @akshar2026 chats after #TeamIndia win the #INDvAUS Test – By @RajalArora
FULL INTERVIEW https://t.co/YW7ZMWSBwX pic.twitter.com/gAqNvrvRHO
— BCCI (@BCCI) February 20, 2023
अक्षर पटेल : आज आमच्यासोबत सर रविंद्र जडेजा आहेत. मला वाटतं मलाच चहल टीव्ही चालू करावी लागेल. माझा स्वत:चा खेळ असूनही माझ्याच हाती माईक दिला आहे. सर, माझी गोलंदाजी तर होत नाही. अक्षरला बॉलिंग देऊ नये म्हणून अशी गोलंदाजी करत आहेस. सहा महिने ब्रेकवर होतास. तेव्हाच हाच विचार करत होतास जाऊन सरळ वसूल करायचं आहे.
रविंद्र जडेजा : पाच स्टंपचे आवाज आले ते पण एकदम जोरदार..हाच प्रयत्न होता.
अक्षर पटेल : जोरदार आवाज आले.मी तेच सांगत होतो. मी पॉईंटला होतो आणि हमssहमss असा आवाज येत होता.
रविंद्र जडेजा : मी खूप जोरात टाकत होतो.पण तू जेव्हा बॅटिंग करत होतास तेव्हा वाटत नव्हतं की, टर्निंग आणि लो बॉउन्स पिचवर खेळत होतो.असं वाटत होतं पाटा पिच आहे.त्यांचे गोलंदाज एकदम साधारण वाटत होते.त्याचं काय गुपित आहे. ते गुपित आम्हाला पण सांग.
अक्षर पटेल : ते टेक्निक आहे जे की, स्विप, रिव्हर्स स्विप मारणं कठीण आहे. त्यामुळे ते मारण्याचा मी प्रयत्नच केला नाही.