T20 World Cup : टीम इंडियाचे विश्वचषकातील सगळे सामने थिएटरमध्ये पाहता येणार
टीम इंडियाचे जेवढे सामने होणार आहेत, ते सगळे सामने तुम्हाला थिअरटरमध्ये पाहायला मिळणार आहेत.
येत्या रविवारपासून T20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यामुळे चाहत्यांची आत्तापासून उत्सुकता वाढली आहे. कारण ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक स्पर्धेसाठी सोळा टीम दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत अनेक खेळाडूंनी रेकॉर्ड केले आहेत. त्यामुळे यावर्षी सुद्धा तसेच रेकॉर्ड (Cricket Record) पाहायला मिळणार आहे. पण यंदा विशेष म्हणजे टीम इंडियाचे सगळे सामने प्रेक्षकांना थिअटरमध्ये पाहायला मिळणार आहेत.
टीम इंडियाचे जेवढे सामने होणार आहेत, ते सगळे सामने तुम्हाला थिअरटरमध्ये पाहायला मिळणार आहेत. मल्टीप्लेक्स कंपनी इनोक्स ही सगळे सामने दाखवणार आहे. विशेष म्हणजे मल्टीप्लेक्स कंपनी इनोक्ससोबत आयसीसीने करार केला आहे.
भारतात टीम मल्टीप्लेक्स कंपनी इनोक्सचे पंचवीस शहरात सुविधा उपलब्ध आहेत. तिथं चाहत्यांना मॅच पाहता येणार आहे.
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
T20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाच्या मॅच :
• भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न) • भारत विरुद्ध गट अ उपविजेता, 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता (सिडनी) • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर, दुपारी 4.30 (पर्थ) • भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (अॅडलेड) • भारत विरुद्ध गट ब विजेता, 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)