Surykumar Yadhav : सुर्यकुमार यादवने रिजवानला टाकलं पाठीमागे, पाहा काय केलायं रेकॉर्ड
आयपीएलमध्ये सुद्धा सुर्यकुमार यादवने आपली चांगली छाप पाडली आहे. त्यामुळे तो खेळत असताना अनेकदा समोरच्या गोलंदाजाला अधिक विचार करावा लागत असेल.
आशिया चषकात (Asia Cup 2022) चमकदार कामगिरी केल्यानंतर सुर्यकुमार यादव (Surykumar Yadhav) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे ज्यावेळी त्याची फलंदाजी चांगली होते, त्यावेळी त्याची सगळ्या सोशल मीडियावर (Social Media) अधिक चर्चा असते. कालपासून त्याचे सिक्स मारलेले व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाले आहेत.
ऑस्ट्रे्लियाविरुद्ध चांगली खेळी केल्यामुळे विश्वचषकात चाहत्यांच्या सुद्धा अपेक्षा वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम आणि महत्त्वाच्या सामन्यात त्याने चांगली खेळी केली. त्यामुळे चाहत्यांनी त्याची सोशल मीडियावर अधिक तारिफ केली.
आयपीएलमध्ये सुद्धा सुर्यकुमार यादवने आपली चांगली छाप पाडली आहे. त्यामुळे तो खेळत असताना अनेकदा समोरच्या गोलंदाजाला अधिक विचार करावा लागत असेल. कारण एकदा सुर्यकुमार जोरात खेळायला लागला की, तो चौफेर फटकेबाजी करतो.
सुर्यकुमारच्या नावावर 45 सिक्स मारल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे तो सध्या आघाडीवर आला आहे. विशेष म्हणजे हे सिक्स त्याने 2022 मध्ये मारले आहेत. मोहम्मद रिझवानने 42 सिक्स मारल्यामुळे तो दुसऱ्या क्रमाकावर आहे. मार्टिन गप्टील तिसऱ्या क्रमांकावर आहे.