अंबाती रायुडूची धक्कादायक निवृत्ती, नाराज रायुडूचा क्रिकेटला अलविदा!
विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड न झालेल्या नाराज अंबाती रायुडूने धक्कादायकरित्या क्रिकेटला अलविदा केला आहे. अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केला आहे केला आहे.
मुंबई : विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड न झालेल्या नाराज अंबाती रायुडूने धक्कादायकरित्या क्रिकेटला अलविदा केला आहे. अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीबाबत त्याने बीसीसीआयला लेखी कळवलं आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नईकडून खेळलेल्या रायुडूने जबरदस्त कामगिरी केली होतीच, शिवाया भारताकडून खेळतानाही रायुडूने अनेक मॅचविनिंग खेळी केल्या होत्या. मात्र तरीही वर्ल्डकपसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. याबाबतची नाराजी त्याने बोलून दाखवली होती.
यंदाच्या विश्वचषकासाठी 15 जणांची भारतीय टीमची घोषणा केली, त्यावेळी रायडूला राखीव खेळाडू म्हणून टीममध्ये संधी देण्यात आली होती. मात्र विश्वचषकात शिखर धवन आणि विजय शंकर या दोन खेळांडूंना दुखापत झाल्यानतंर बीसीसीआयने मयांक अग्रवाल आणि रिषभ पंत यांची निवड करत त्यांना इंग्लंडला बोलवले. याच कारणामुळे तो नाराज असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली होती. दरम्यान रायडूने निवृत्तीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण तो आयपीएल खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
Indian middle-order batsman Ambati Rayudu has announced his retirement from all forms of cricket, he has written to BCCI pic.twitter.com/v4Wf3fwZ5i
— ANI (@ANI) July 3, 2019
अंबाती रायडू हा 33 वर्षाचा असून त्याने भारताकडून 55 वन डे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 1 हजार 694 धावा केल्या असून, 3 शतकं आणि 10 अर्धशतकं झळकावली आहेत. रायडूने 6 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. रायडूने 2013 मध्ये वनडे क्रिकेट सामन्यांपासून पदापर्ण केले होते. त्याने आतापर्यंत एकही टेस्ट मॅच खेळलेली नाही.
आयसीसीही चकीत
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वन डे विश्वचषकासाठी (ICC World Cup 2019) भारतीय संघाची (Indian squad for Cricket World Cup 2019) घोषणा झाली, त्यावेळी आयसीसीही चकीत झाली होती. कारण इन फॉर्म खेळाडू असलेल्या रायुडूला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. रायुडूचा सध्याचा फॉर्म पाहता त्याची टीम इंडियात निवड होईल असा विश्वास अनेकांना होता. मात्र भारतीय निवड समितीने रायुडूचा 15 जणांच्या भारतीय संघात समावेश केला नाही. त्यामुळे आयसीसीने त्यावेळी ट्विट करुन रायुडूची आकडेवारी शेअर करत, त्याची विश्वचषकासाठी निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं होतं.
Highest batting averages for India in ODI cricket (min. 20 innings):
1. @imVkohli – 59.57 2. @msdhoni – 50.37 3. @ImRo45 – 47.39 4. @RayuduAmbati – 47.05 5. @sachin_rt – 44.83
Rayudu was excluded from India’s @cricketworldcup squad. Do you think he should have made the cut? pic.twitter.com/8Eu0ztKTH1
— ICC (@ICC) April 15, 2019
विश्वचषकासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी
संबंधित बातम्या
अंबाती रायुडूची निवड न झाल्याने ICC ही थक्क, स्वत: रायुडूची आकडेवारी BCCI ला दिली!