अंबाती रायुडूच्या निवृत्तीची ‘तीन’ कारणे

विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड न झालेल्या नाराज अंबाती रायुडूने धक्कादायकरित्या क्रिकेटला अलविदा केला आहे. वर्ल्डकपसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. त्यामुळे तो नाराज झाला होता.

अंबाती रायुडूच्या निवृत्तीची 'तीन' कारणे
Follow us
| Updated on: Jul 03, 2019 | 4:18 PM

Ambati Rayudu retires मुंबई : विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड न झालेल्या नाराज अंबाती रायुडूने धक्कादायकरित्या क्रिकेटला अलविदा केला आहे. अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीबाबत त्याने बीसीसीआयला लेखी कळवलं आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नईकडून खेळलेल्या रायुडूने जबरदस्त कामगिरी केली होतीच, शिवाय भारताकडून खेळतानाही रायुडूने अनेक मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. असे असतानाही वर्ल्डकपसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. त्यामुळे तो नाराज झाला होता. याबाबत ट्विट करत त्याने  त्याची नाराजीही बोलून दाखवली होती

‘या’ कारणामुळे रायुडूची निवृत्ती

यंदाच्या विश्वचषकासाठी बीसीसीआयने 15 जणांची भारतीय टीमबाबत घोषणा केली. त्यात विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल,  कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या,  रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांना 15 जणांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता.

विश्वचषकात 9 जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सलामीवीर शिखर धवनने शतकी खेळी केली होती. मात्र त्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यावेळी सुरुवातीला त्याला तीन आठवड्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या ऐवजी संघात विजय शकंरला संधी देण्यात आली. मात्र त्यानंतर धवन संपूर्ण विश्वचषकातून बाहेर पडला.

यानंतर अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी विजय शंकर नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना गोलंदाज जसप्रीत बुमराचा यॉर्कर त्याच्या पायावर लागला. त्यामुळे विजय शंकरला दुखापत झाली. असे असतानाही तो अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळला. मात्र त्यात त्याला चमकदार कामगिरी न करता आल्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्याऐवजी ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं.

म्हणजेच बीसीसीआयने शिखर धवन ऐवजी रिषभ पंतला आणि विजय शंकर ऐवजी कर्नाटकचा स्फोटक सलामीवीर मयांक अग्रवालला टीम इंडियात स्थान दिले होते. पण बीसीसीआयने राखीव खेळाडू असलेल्या अंबाती रायुडूने संघात घेतले नाही. त्याच्याऐवजी ऋषभ पंत आणि मयांक अग्रवाल यांची निवड झाली आहे. त्यामुळे अंबाती रायडू नाराज झाला.

सुरुवातील विश्वचषकात सहभागी न झाल्याने आणि नंतर दोन वेळा जाणूनबुजून डावललं गेल्याने त्याने क्रिकेटला अलविदा केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्याशिवाय नाराज रायुडूने थेट बीसीसीआयला पत्र लिहून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे.

कोण आहे अंबाती रायडू?

अंबाती रायडू हा 33 वर्षाचा असून त्याने भारताकडून 55 वन डे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 1 हजार 694 धावा केल्या असून, 3 शतकं आणि 10 अर्धशतकं झळकावली आहेत.  रायडूने 6 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. रायडूने 2013 मध्ये वनडे क्रिकेट सामन्यांपासून पदापर्ण केले होते. त्याने आतापर्यंत एकही टेस्ट मॅच खेळलेली नाही.

संबंधित बातम्या : 

रायुडूची निवृत्ती : जेव्हा ICC नेच BCCI ला विचारलं होतं रायडूची निवड का नाही?

… तर चिडलेला अंबाती रायुडू आईसलँडकडून खेळणार?

अंबाती रायुडूची धक्कादायक निवृत्ती, नाराज रायुडूचा क्रिकेटला अलविदा!

….म्हणून पंतऐवजी दिनेश कार्तिकची वर्ल्ड कपसाठी निवड!   

ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर  

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.