अंबाती रायुडूची निवड न झाल्याने ICC ही थक्क, स्वत: रायुडूची आकडेवारी BCCI ला दिली!
मुंबई: इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी (ICC World Cup 2019) भारतीय संघाची (Indian squad for Cricket World Cup 2019) घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात समावेश होईल अशी अनेक खेळाडूंना अपेक्षा होती. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे अंबाती रायुडू (Ambati Rayudu). रायुडूचा सध्याचा फॉर्म पाहता त्याची टीम इंडियात निवड होईल असा विश्वास अनेकांना होता. मात्र […]
मुंबई: इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी (ICC World Cup 2019) भारतीय संघाची (Indian squad for Cricket World Cup 2019) घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात समावेश होईल अशी अनेक खेळाडूंना अपेक्षा होती. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे अंबाती रायुडू (Ambati Rayudu). रायुडूचा सध्याचा फॉर्म पाहता त्याची टीम इंडियात निवड होईल असा विश्वास अनेकांना होता. मात्र भारतीय निवड समितीने रायुडूचा 15 जणांच्या भारतीय संघात समावेश केला नाही.
निवड न झाल्याने अंबाती रायुडू नाराज झाला आहे. रायुडूने आपली खदखद ट्विटरवर व्यक्त केली आहे. वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी नुकतंच 3D चष्म्याची ऑर्डर केली आहे, असं ट्विट रायुडूने केलं आहे.
Just Ordered a new set of 3d glasses to watch the world cup ??..
— Ambati Rayudu (@RayuduAmbati) April 16, 2019
दुसरीकडे आयसीसीनेही रायुडूचा टीम इंडियात समावेश न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर क्रिकेटतज्ज्ञ आणि समालोचक हर्षा भोगले यांनी तर रायुडूचं करिअरच संपल्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, आयसीसीने भारतीय खेळाडूंची 20 सामन्यातील सरासरी काढली आहे. यामध्ये विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मानंतर अंबाती रायुडूचा नंबर लागतो. सरासरीत रायुडू सचिनच्याही पुढे आहे. हे आकडे शेअर करताना आयसीसीने म्हटलंय की, “रायुडूला भारताच्या वर्ल्डकप संघातून वगळण्यात आलं आहे. तुम्हाला वाटत नाही का त्याचा समावेश व्हायला हवा होता?”
विराट कोहली 59.57, महेंद्रसिंह धोनी 50.37, रोहित शर्मा 47.39, अंबाती रायुडू 47.05 आणि सचिन तेंडुलकरची सरासरी 44.83 इतकी आहे.
Highest batting averages for India in ODI cricket (min. 20 innings):
1. @imVkohli – 59.57 2. @msdhoni – 50.37 3. @ImRo45 – 47.39 4. @RayuduAmbati – 47.05 5. @sachin_rt – 44.83
Rayudu was excluded from India’s @cricketworldcup squad. Do you think he should have made the cut? pic.twitter.com/8Eu0ztKTH1
— ICC (@ICC) April 15, 2019
‘रायुडूचं करिअर संपलं’ दरम्यान, समालोचक हर्षा भोगले यांनी अंबाती रायुडूच्या करिअरबद्दलच शंका उपस्थित केली आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीसह अनेक खेळाडू अंबाती रायुडूच्या फलंदाजीचं कौतुक करतात, असं हर्षा भोगलेंचं म्हणणं आहे. त्यांच्या मते, “भारतीय क्रिकेटमध्ये अंबाती रायुडूची कहाणी वेगळीच आहे. 2015 च्या विश्वचषकापूर्वी रायुडू सर्व सामने खेळला, मात्र त्याचा वर्ल्डकपसाठीच्या संघात समावेश झाला नाही. आता 2019 मध्येही आशिया चषकापासून रायुडू भारतीय संघाकडून खेळत आहे. कर्णधार विराट कोहलीही रायुडू चौथ्या नंबरसाठी फिट असल्याचं म्हणतो. मात्र त्याला विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालं नाही. रायुडू सध्या 34-35 वर्षांचा आहे, त्यामुळे त्याला आता विश्वचषकासाठी स्थान मिळणं कठीण आहे”.
विश्वचषकासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी
एकदिवसीय विश्वचषकाला (ICC Cricket World Cup 2019) 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.
संबंधित बातम्या
….म्हणून पंतऐवजी दिनेश कार्तिकची वर्ल्ड कपसाठी निवड!
ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर
ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, स्मिथ-वॉर्नर परतले
IPL 2019: ड्वेन ब्रावोच्या हातात बॅट-बॉल सोडून वस्तरा-कात्री
‘या’ ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूचा IPL प्रकरणी विमा कंपनीविरोधात 15.3 लाख डॉलरचा खटला