England Tour South Africa | इंग्लंडविरुद्धच्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा
क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे.
केपटाऊन : इंग्लंडविरुद्धच्या टी 20 (T 20 Series) आणि एकदिवसीय मालिकेसाठी (Odi Series) (England Tour South Africa) दक्षिण आफ्रिकेने (CSA) संघाची घोषणा केली आहे. संघामध्ये 28 वर्षीय ग्लेंटन स्टर्ममॅनला संधी देण्यात आली आहे. टी-20 आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकेत क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे. तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी याआधीच टीमची घोषणा केली आहे. announcement of south africa’s t20 and odi squad for the series against england
? ANNOUNCEMENT
Here they are! Our 24-man Proteas squad for the upcoming white-ball tour against England on home soil.
Full squad ?#SAvENG #SeeUsOnThePitch pic.twitter.com/wzoF0vszJv
— Cricket South Africa (@OfficialCSA) November 6, 2020
इंग्लंड दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला टी 20 मालिकेपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात प्रत्येकी 3 टी 20 आणि 3 वनडे सामने खेळण्यात येणार आहेत. या दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दुसरी टी मॅच 29 नोव्हेंबर आणि तिसरा टी 20 सामना 1 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. यानंतर 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
England Tour South Africa | टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिली टी 20 सामना, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, 27 नोव्हेंबर
दुसरा टी 20 सामना, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, 29 नोव्हेंबर
तिसरा टी 20 सामना, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, 1 डिसेंबर
वनडे मालिका
पहिला एकदिवसीय सामना, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, 4 डिसेंबर
दुसरा एकदिवसीय सामना, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, 6 डिसेंबर
तिसरा एकदिवसीय सामना, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, 9 डिसेंबर
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ :
क्विंटन डी कॉक (कर्णधार), टेम्बा बवुमा, जूनियर डाला, फॅफ डु प्लेसिस, बीजोर्न फोर्टिन, ब्यूरन हेंड्रिक्स, रीजा हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, यानेमन मलान, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिदी, एनरिक नॉर्तजे, एंडी फेहलुकवायो, ड्वाइन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, लुथो सिंपला, जॉन-जॉन स्मूट्स, ग्लेंटन स्टुरमॅन, पीट वॅन बिल्जोन, रासी वॅन डेर डुसेन आणि काइल वेरीन
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्टेडियममध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहता येता येणार नाही. वनडे आणि टी 20 मालिकेतील एकूण 6 सामने न्यूलँड्स आणि बोलॅंड पार्क या स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहेत. दरम्यान आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या समाप्तीनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
संबंधित बातम्या :
India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर
विराटच्या वाटेला जाऊ नका; स्टीव्ह वॉचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना इशारा
announcement of south africa’s t20 and odi squad for the series against england