T20 World Cup : टीम इंडियाला आणखी एक धक्का, जलगती गोलंदाज जखमी
टीम इंडियाकडे सध्या चांगली गोलंदाजी करतील असे खेळाडू कमी असल्याचे अनेकदा जाणवले आहे.
टीम इंडियाचा (Team India) दुसरा गोलंदाज जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) जखमी झाल्यानंतर टीम इंडियाचा आणखी एक गोलंदाज जखमी झाला आहे. विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेतून बुमराह बाहेर गेल्यानंतर दीपक चाहरला दुखापत झाली आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या पुढच्या दोन सामन्यात तो खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
दीपक चाहरच्या घोट्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
दीपक चाहर सद्या बेंगलुरु इथल्या अकाडमीमध्ये दाखल झाला आहे. त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मोहम्मद शम्मी आणि दीपक चहर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या आगोदर दाखल होतील.
टीम इंडियाकडे सध्या चांगली गोलंदाजी करतील असे खेळाडू कमी असल्याचे अनेकदा जाणवले आहे. त्याचबरोबर दीपक चाहरला सद्या आरामाची गरज आहे.