Virat Kohli : अनुष्का शर्माची सहकलाकार विराट कोहलीला भेटली, हसू आवरेना…
अंशुल चौहानने तो व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आशिया चषकात (Asia Cup 2022) विराट कोहलीने (Virat Kohli) चांगली कामगिरी केल्यापासून तो पुन्हा चर्चेत आला आहे. कारण झालेल्या आशिया चषकात त्याने आपली शतकी पारी खेळली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी त्याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीने त्यांचं 71 आंतरराष्ट्रीय शतक अफगाणिस्तान विरुद्ध झळकावलं आहे.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
झालेल्या आशिया चषकाच्या मुख्य सामन्या विराट कोहलीला सुद्धा फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे तो पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मागच्या तीन वर्षात विराट कोहलीकडून एकही शतक झालं नव्हतं.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हीने नुकतीच विराट कोहलीची तिची सहकलाकार अंशुल चौहान भेट घडवून आणली. त्या दिवशी अंशुल चौहानचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने भेट झाल्याने ती अधिक खूष होती. त्याचबरोबर विराट कोहलीला पाहिल्यानंतर तिचं स्वत: वर कंट्रोल राहिलं नाही. ती फक्त हसतं राहिली.
अंशुल चौहानने तो व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला आहे. त्यावर अनेकांनी अंशुल चौहानला इतकं हसण्याचं कारण काय असं देखील विचारलं आहे.