गंभीरच्या भाजपप्रवेशावेळी जेटलींकडून ‘त्या’ सामन्याचं उदाहरण

नवी दिल्ली : अखेर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने कमळ हाती घेतलं. गंभीरने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून गौतम गंभीरच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. अखेर गंभीरने भाजापमध्ये प्रवेश करुन या चर्चांना पूर्णविराम दिला. तो दिल्लीतून लोकसभा निवडणूकही लढवण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरच्या प्रवेशावेळी जेटलींना काही प्रश्न विचारण्यात […]

गंभीरच्या भाजपप्रवेशावेळी जेटलींकडून 'त्या' सामन्याचं उदाहरण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली : अखेर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने कमळ हाती घेतलं. गंभीरने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून गौतम गंभीरच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. अखेर गंभीरने भाजापमध्ये प्रवेश करुन या चर्चांना पूर्णविराम दिला. तो दिल्लीतून लोकसभा निवडणूकही लढवण्याची शक्यता आहे.

गौतम गंभीरच्या प्रवेशावेळी जेटलींना काही प्रश्न विचारण्यात आले. काँग्रेसचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी पाकिस्तानविषयी सहानुभूतीपूर्वक जे वक्तव्य केलं, त्यावरही जेटलींना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी मैदानात नेहमीच पाकिस्तानी खेळाडूंना भिडणाऱ्या गौतम गंभीरचं उदाहरण देत एका प्रश्नाला उत्तर दिलं.

गौतम गंभीरचे तुम्ही क्रिकेट खेळतानाचे आणि आताचेही पाकिस्तानविषयीचे ट्वीट वाचले, तर त्यात किमान पाकिस्तानविषयी सहानुभूती तरी दिसत नाही. किमान पाकिस्तानचा पुळका येणाऱ्या माजी खेळाडूंविषयी आमचा जो अनुभव आहे, तसं यामध्ये काही दिसत नाही, असं जेटली म्हणाले. जेटलींचा थेट निशाणा माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धूवर होता. सिद्धू सध्या पंजाबचे मंत्री आहेत. त्यांनी भाजपातून राजकारणाची सुरुवात केली आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पाकिस्तानविषयी सहानुभूतीपूर्वक वक्तव्य केल्यामुळे सिद्धूंवर नेहमीच टीका केली जाते. शिवाय सिद्धूंचे मित्र आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीलाही सिद्धू यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे तिथे जाऊन सिद्धू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेटही घेतली होती. तोच धागा पकडत जेटलींनी निशाणा साधला.

गौतम गंभीर हा मैदानावर अत्यंत आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जायचा. पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत गंभीरची अनेकदा मैदानातच शाब्दिक बाचाबाचीही झालेली आहे. एका सामन्यात गंभीर पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कम्रान अकमलवर धावूनही गेला होता. पण पंचांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद सोडवला होता.

VIDEO : पाहा गंभीर आणि अकमलचा वाद

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.