Video: नाथन लायनला बाद केल्यानंतर अश्विनने शमीचे पिळले कान! गावसकरांनी दिली अशी प्रतिक्रिया
आर. अश्विनने केलेल्या कृतीचा एक रिल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कारण अश्विनने केलेली कृती कॅमेऱ्यात टिपली गेली होती. अश्विनची कृती रिपीट टेलिकास्टमध्ये पाहिल्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस संपला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 263 धावांवर बाद झाला.या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जबरदस्त कामगिरी केली. मोहम्मद शमीने 14.4 षटकात 4 निर्धाव षटकं टाकत 60 धावा देत 4 गडी बाद केले. मोहम्मद शमीने नाथन लायनला बाद केल्यानंतर आर. अश्विनने केलेल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नाथन 10 धावांवर असताना मोहम्मद शमीने त्याचा त्रिफळा उडवला.त्यानंतर आर. अश्विनने केलेल्या कृतीचा एक रिल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कारण अश्विनने केलेली कृती कॅमेऱ्यात टिपली गेली होती. अश्विनची कृती रिपीट टेलिकास्टमध्ये पाहिल्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना 75 वं षटक मोहम्मद शमीला सोपवण्यात आलं.नाथन लायन 10 या धावसंख्येवर खेळत असताना मोहम्मद शमीने त्याला बाद केलं. त्यानंतर सर्व खेळाडू मोहम्मद शमीचं अभिनंदन करण्यासाठी एकत्र आले. तेव्हा फिरकीपटू आर. अश्विननं शमीचे पाठून येत कान पिळले.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) February 17, 2023
अश्विनच्या या कृतीनंतर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिली. “मला असं वाटतं की तुम्ही थोड्या वेळानं अश्विनला विचारलं काय करत होता, तर तो सांगेल मी वेगळ्या प्रकारची डिलिव्हरी टाकण्याचा सराव करत होतो. ” मोहम्मद शमीने डेविड वॉर्नर (15), ट्रविस हेड (12), नाथन लायन (10) आणि मॅथ्यू कुहनेमन (6) यांना बाद केलं.
ऑस्ट्रेलियाचा डाव
डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजानं संघाला चांगली सुरुवात करुन दिली खरी..पण मधल्या फळीच्या फलंदाजाना डाव सावरता आला नाही. डेविड वॉर्नर आणि उस्माननं पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर तंबूत परतला. त्यानंतर ख्वाजा साथ देण्यासाठी मार्नस लाबुसचेन मैदानात उतरला. दोघांनी 41 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. मात्र मधल्या फळीच्या हँडस्कॉम्ब आणि पॅट कमिन्स जोडीनं चांगली कामगिरी केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.