Asia Cup 2022 : आजच्या सामन्यात भारतालासमोर करो या मरो स्थिती, आव्हान टिकवण्यासाठी विजय महत्त्वाचा
सद्याचा घडीला भारतीय संघात चांगले फलंदाज आहेत. त्याचबरोबर त्यांची कामगिरी सुद्धा चांगली राहिलेली आहे. तरी सुद्धा आज भारतीय संघात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : सुरु असलेल्या आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय संघाला (Indian Team) पाकिस्तानच्या संघाने हरवले. त्यामुळे आशिया चषकात पुन्हा रंगत तयार झाली आहे. भारत आणि श्रीलंका या दोन संघामध्ये आज अटातटीचा सामना होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताला विजय गरजेचा आहे. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात भारतीय संघाला करो या मरो अशी स्थिती आहे. आजचा सामना दुबईत होणार आहे. आज रोहित शर्माला (Rohit Sharma) अनोख्या शैलीचा खेळ करावा लागणार आहे.
मागच्या सामन्यात दिग्गजांकडून चांगली फलंदाजी
रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहूल या दिग्गज खेळाडूंनी मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. तिघांकडून आजही भारतीय चाहत्यांना चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. विराट कोहलीने झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात अर्धशतकी पारी खेळली आहे.
भारतीय फलंदाजांना लय सापडली
सद्याचा घडीला भारतीय संघात चांगले फलंदाज आहेत. त्याचबरोबर त्यांची कामगिरी सुद्धा चांगली राहिलेली आहे. तरी सुद्धा आज भारतीय संघात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जागी दीपक हुड्डाला संधी देण्यात आली होती.
असा असेल भारतीय संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, दिनेश कार्तिक, आवेश खान, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन.
असा असेल श्रीलंका संघ
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुनाथिलक, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, अशेन बंदारा, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिष तेक्षाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक, कारनानाना, फेर्नानाना, धनंजय डी सिल्वा. , अशेन बंडारा, धनंजय डी सिल्वा आणि दिनेश चंडिमल